धुळ्यात रंगला 'नारीशक्ती'चा जागर ! विविध क्षेत्रांतील राज्यस्तरीय पुरस्काराने महिलांचा सन्मान .. धुळे/प्रतिनिधी - नरेंद्र रायसिंग ...
धुळ्यात रंगला 'नारीशक्ती'चा जागर ! विविध क्षेत्रांतील राज्यस्तरीय पुरस्काराने महिलांचा सन्मान ..
धुळे/प्रतिनिधी - नरेंद्र रायसिंग मो. 8999838651
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धुळे:- येथील जागतिक महिला दिनानिमित्ताने जिल्हा परिषद सभागृहात रविवार (दि. १५ मार्च २०२६ ) रोजी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा 'राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला. अत्यंत दिमाखदार आणि प्रेरणादायी वातावरणात हा सोहळा पार पडला. तसेच धुळे येथील 'शांतीरक्षक कल्याण संस्था' (पोलिस मित्र), 'अखिल भारतीय नवोदय युवा युवती मंच' आणि 'गायत्री सोशल अँड वेलफेअर संस्था' यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य - दिव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. तसेच या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगांव, अमरावती, नागपूर, चंद्रपुर, नांदेड, नाशिक, पुणे व मुंबई जिल्ह्यातील शैक्षणिक, कला - क्रीडा, सांस्कृतिक, लघुउद्योजीका उद्योक- व्यवसाय, रीलस्टार, वैद्यकीय, पोलीस कर्मचारी, तसेंच सामाजिक कार्यकर्त्या अशा विविध क्षेत्रातील महिला, युवती, विद्यार्थीनींना "नारी शक्ती पुरस्कार"प्रदान करण्यात आला. तसेच सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
*विशेष मान्यवरांची उपस्थिती* - सदर या कार्यक्रमात धुळे मनपा च्या नवनिर्वाचित महापौर श्रीमती. मायादेवी परदेशीं, उपमहापौर सौ. ज्योत्सना पाटील, धुळे आझाद नगर पो.स्टे.च्या PSI राजश्री पाटील, नंदुरबार दामिनी पथकच्या ज्योती पाटील, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ सौ.अनुराधा भामरे, भाजपा धुळे ग्रामीण अध्यक्ष श्री. बापूसाहेब खलाने, MSW महाविद्यालयच्या श्रीमती.ज्योती बर्डे, दिशा समितीच्या सौ. हेमांगी शाम सनेर, धुळे तालुका तालीम संघांचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री.कल्याणभाऊ गरुड, शेतकरी मित्र व सामाजिक कार्यकर्ते श्री.अभय पाटील, गायत्री सोशल अँड वेलफेयर संस्थेचे चंद्रकांत येशीराव, निवेदक राकेश गाळणकर व प्रियंका कपोले यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. आणि या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजक धुळे येथील शांती रक्षक कल्याण संस्था ' पोलीस मित्रचे पदाधिकारी धुळे जिल्हा प्रमुख सागर राणे सर, धुळे शहर अध्यक्ष संदीप बारी सर धुळे जिल्हा उपाध्यक्ष विजय सोनार सर धुळे जिल्हा महिला अध्यक्षा अपूर्वा देसले ,धुळे जिल्हा महिला उपाध्यक्ष अश्विनी सोनार सदस्य दुर्गेश राणे सर दीपा धनगर मॅडम लक्ष्मी ठाकूर मॅडम,नवोदय युवा मंचचे अध्यक्ष व आयोजक प्रमुख अमितकुमार बडगुजर यांनी कार्यक्रमाची सांगता करत या पुरस्कार वितरण सोहळ्यात जमलेल्या उपस्थित मान्यवर पत्रकार आणि महिला व विद्यार्थिनी यांचे आभार मानून आपले मत व्यक्त केले..

No comments