रुईखेडे येथे विज्ञान कार्यशाळेचा उत्साह; विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची जाणीव प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत...
रुईखेडे येथे विज्ञान कार्यशाळेचा उत्साह; विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची जाणीव
प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रुईखेडे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड, जिज्ञासा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा या उद्देशाने मंजाबाई महादू नारखेडे विद्यालय, रुईखेडे येथे एक दिवसीय विज्ञान कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण झाले आणि त्यांच्या डोळ्यांत जिज्ञासेचे तारे चमकताना दिसून आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बढे दादा यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेसाठी प्रमुख वैज्ञानिक मार्गदर्शक म्हणून सुशांत प्रभाकर जगताप सर उपस्थित होते. अध्यक्षांच्या हस्ते त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
विद्यालयाचे नवनियुक्त मुख्याध्यापक राहुल युवराज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले. सोनवणे सर हे उपक्रमशील व विद्यार्थीकेंद्रित शिक्षणावर भर देणारे मुख्याध्यापक म्हणून ओळखले जातात. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विद्यालयात शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, शिस्तबद्ध व सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करणे तसेच विविध शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देणे यावर विशेष भर दिला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञानाची जोड मिळावी आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन योगिता झांबरे मॅडम यांनी केले. त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देत कार्यक्रमाला सुरुवात केली.
यानंतर जगताप सरांनी विज्ञानातील विविध संकल्पना, खगोलशास्त्रातील ग्रह-तारे तसेच काही मनोरंजक प्रयोग करून त्यामागील वैज्ञानिक तत्त्वे विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या आणि रंजक पद्धतीने समजावून सांगितली. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील फरक स्पष्ट करत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
कार्यक्रमाच्या शेवटी योगिता झांबरे मॅडम यांनी आभार प्रदर्शन करत जगताप सरांना भविष्यात विद्यार्थ्यांसाठी आकाशदर्शन कार्यक्रम घेण्यासाठी पुन्हा विद्यालयात येण्याची विनंती केली.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक शशिकांत सोनवणे सर, संदीप चौधरी सर, बबिता तडवी मॅडम, साखरे सर तसेच पी.टी. सावकारे सर यांनी विशेष सहकार्य केले.
“जिज्ञासेची ठिणगी पडली की विज्ञानाची ज्योत पेटते,
ज्ञानाच्या प्रकाशात मग अंधश्रद्धेची सावलीही हरवून जाते.”

No comments