adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

याहा अँग्रो क्रिकेट प्रीमियर लीग मेलाणे; आदिवासी खेळाडूंना मिळाले हक्काचे व्यासपीठ

 याहा अँग्रो क्रिकेट प्रीमियर लीग मेलाणे; आदिवासी खेळाडूंना मिळाले हक्काचे व्यासपीठ  चोपडा (प्रतिनिधी): (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शहरी भा...

 याहा अँग्रो क्रिकेट प्रीमियर लीग मेलाणे; आदिवासी खेळाडूंना मिळाले हक्काचे व्यासपीठ 


चोपडा (प्रतिनिधी):

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शहरी भागापुरत्या मर्यादित राहिलेल्या क्रिकेट स्पर्धांच्या पलीकडे जाऊन ग्रामीण व दुर्गम आदिवासी पाड्यांवरील सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या याहा अँग्रो क्रिकेट प्रीमियर लीग मेलाणे (सीजन–01) या स्पर्धेचा उत्साहात समारोप झाला. “एक गाव – एक संघ” या संकल्पनेतून आयोजित या स्पर्धेमुळे अनेक होतकरू खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळाले.

स्पर्धेतील अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. या रोमांचक लढतीत आयोजक संघ युवा मेलाणे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला मा. सरपंच प्रताप खाज्या पावरा यांच्या हस्ते ₹21,001 रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

तर उपविजेता बलवाडी संघाला मा. सभापती ताराचंद खुमान पावरा यांच्या हस्ते ₹11,001 चे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

या स्पर्धेत आदिवासी पाड्यांवरील खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळ कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये दडलेली गुणवत्ता या स्पर्धेमुळे उजेडात आली.

साधारणपणे मोठ्या क्रिकेट स्पर्धा शहरांपुरत्याच मर्यादित राहतात, त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील गुणवंत खेळाडू संधीपासून वंचित राहतात. ही उणीव लक्षात घेऊन याहा अँग्रो क्रिकेट प्रीमियर लीग मेलाणे चे संचालक करण पावरा यांनी या स्पर्धेचे आयोजन केले. त्यांच्या या उपक्रमामुळे स्थानिक खेळाडूंना नवे व्यासपीठ मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक व्यक्त केले जात आहे.

No comments