adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगांव जिल्ह्यात पती-पत्नीकडूंन प्रियकरांची हत्या; पती-पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

  जळगांव जिल्ह्यात पती-पत्नीकडूंन प्रियकरांची हत्या; पती-पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!   सौ. शुभांगी सरोदे पुरीगोसावी  जळगांव जि. प्रतिन...

 जळगांव जिल्ह्यात पती-पत्नीकडूंन प्रियकरांची हत्या; पती-पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!  


सौ. शुभांगी सरोदे पुरीगोसावी  जळगांव जि. प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 विवाहित महिलेवर असलेल्या प्रेमाचा शेवट कधी चांगला तर कधी वाईट मार्गाने आपणांस पाहायला मिळतो. सध्या अनैतिक संबंधाच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ होत आहे. जळगांव जिल्ह्यातील पोचारा तालुक्यांतील वरसाडे तांडा येथे विवाहित महिलेने आपल्या पतीच्या मदतीने प्रियकरांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी सोनाली जाधव हिचे प्रियकर विजय राठोडवर प्रेम संबंध होते. प्रियकरांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळलेल्या सोनालीने आपल्या पतीच्या मदतीने प्रियकरांची हत्या केली. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी पती-पत्नीला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. विजय भीमा राठोड (वय 25) रा. वरसाडे तांडा) हा तरुण 24 फेब्रुवारी रात्रीपासून घरातून बाहेर पडला होता. परत न आल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर तांत्रिक माहिंतीच्या आधारे संजय परशुराम जाधव याला चौकशी करिता पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी त्यांनी प्रथमता: उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. पत्नी सोनाली जाधव हिचे विजय राठोंडशी प्रेम संबंध असल्यामुळे मी आणि पत्नीने मिळून त्याचा खून केला अशी कबुली पोलिसांना दिली. प्रियकर विजय राठोड या तरुणाला कसे संपविले आणि त्याच्या मृत्यूची विल्हेवाट कशी लावली याबाबतही आरोपी पती-पत्नीने पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. आरोपींच्या कबुलीत जबाबाची पडताळणी केली जात आहे तांत्रिक पुरावे मोबाईल डेटा आणि इतर माहिंतीच्या आधारे संपूर्ण घटनेचा तपशील उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेमुळे पाचोरा तालुक्यांत एकच खळबळ उडाली आहे.*

No comments