आदिवासी कोळी शिखर बहुदेशीय संस्था, रावेरची पहिली बैठक उत्साहात संपन्न रावेर येथील श्रद्धा सबुरी बूट हाऊस येथे झालेल्या आदिवासी कोळी शिखर ब...
आदिवासी कोळी शिखर बहुदेशीय संस्था, रावेरची पहिली बैठक उत्साहात संपन्न
![]() |
| रावेर येथील श्रद्धा सबुरी बूट हाऊस येथे झालेल्या आदिवासी कोळी शिखर बहुदेशीय संस्था, रावेरच्या पहिल्या बैठकीप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व सदस्य. |
रावेर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर : आदिवासी कोळी शिखर बहुदेशीय संस्था, रावेर (ता. रावेर, जि. जळगाव) यांची पहिली बैठक रावेर येथील श्रद्धा सबुरी बूट हाऊस येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मनोहर पंडित कोळी होते.
बैठकीत संस्थेच्या स्थापनेमागील उद्दिष्टांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आदिवासी कोळी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी विविध उपक्रम राबविणे, समाजातील युवकांना संघटित करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन देणे तसेच समाजहितासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
यावेळी संस्थेची पदाधिकारी व कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी मनोहर पंडित कोळी (रा. सुलवाडी), उपाध्यक्षपदी विनोद रामचंद्र कोळी (शिवा भाऊजी) (रा. पुनखेडा), सचिवपदी योगेश्वर विश्वनाथ कोळी (रा. तांदलवाडी), सहसचिवपदी सुभाष सुकदेव सपकाळे (रा. सुनोदा), खजिनदारपदी विक्की कृष्णा कोळी (रा. चोरवड), तर कार्याध्यक्षपदी भूषण प्रकाश तायडे (रा. रावेर) यांची निवड करण्यात आली. तसेच प्रसिद्धी प्रमुखपदी शुभम सुनिल कोळी (रा. निंबोल) यांची नियुक्ती करण्यात आली.
सल्लागार म्हणून अशोक रामदास कोळी (रा. वाघोदा), किरण सोपान कोळी (रा. अटवाडा), संतोष वामन सपकाळे (रा. सिगत), हरीलाल रमेश कोळी (रा. कांडवेल) आणि गोपाळ सुधाकर कोळी (रा. खिरवड) यांची निवड करण्यात आली. प्रमुख सल्लागार म्हणून विनोद रामदास कोळी (रा. नेहता) यांची नियुक्ती करण्यात आली.
सदस्य म्हणून संदीप तुकाराम महाले (रा. निंभोरा स्टेशन), विजय देविदास कोळी (रा. अजनाड), सुपडू दोधू मोरे (रा. थोरगव्हाण), समाधान सदाशिव कोळी (रा. पांतोडी), ईश्वर शालीग्राम कोळी (रा. चिनावल), विनोद मिठाराम कोळी (रा. खिर्डी), जयराम चिंतामण कोळी (रा. ऐनपूर), शरद सुपडू कोळी (रा. थोरगव्हाण), उमेश मोहन कोळी (रा. मांगलवाडी) आणि ज्ञानदेव पुंडलिक खवले (रा. तांदलवाडी) यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.

No comments