adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे.ई. स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, मुक्ताईनगरच्या विद्यार्थ्यांचे गांधी विचार संस्कार परीक्षेत घवघवीत यश

 जे.ई. स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, मुक्ताईनगरच्या विद्यार्थ्यांचे गांधी विचार संस्कार परीक्षेत घवघवीत यश  प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपाद...

 जे.ई. स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, मुक्ताईनगरच्या विद्यार्थ्यांचे गांधी विचार संस्कार परीक्षेत घवघवीत यश 


प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर : येथील जे.ई. स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, मुक्ताईनगर व गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या परीक्षेत विद्यालयाचे विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातून समर्थ वंजारी यांनी द्वितीय क्रमांक पटकावत सिल्व्हर पदक मिळवले, तर दिक्षांत चौधरी यांनी तृतीय क्रमांक मिळवत ब्राँझ पदक प्राप्त केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये महात्मा गांधी यांचे विचार, मूल्ये, अहिंसा, सत्य, स्वावलंबन आणि राष्ट्रभक्ती यांचे संस्कार रुजावेत या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत विद्यालयातील पाचवी ते बारावी इयत्तेतील एकूण १४९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ विद्यालयात उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात संस्थेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा तसेच प्राचार्य व्ही. एम. चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन रोहिणीताई खडसे होत्या. व्यासपीठावर प्राचार्य व्ही. एम. चौधरी, उपप्राचार्या व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक एस. व्ही. राणे मॅडम, व्ही. डी. बऱ्हाटे, के. आर. कवळे यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात एस. पी. कोल्हे मॅडम यांनी गांधी विचार संस्कार परीक्षेचे महत्त्व, तिच्यामागील उद्देश तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील तिची भूमिका याबाबत सविस्तर माहिती दिली. गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने ही परीक्षा दरवर्षी शालेय स्तरावर आयोजित केली जाते.

या परीक्षेसाठी एस. बी. वंजारी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले, तर एस. ए. पाटील, सौ. वाय. एस. पाटील आणि प्रा. टी. के. वराडे यांनी सहकार्य केले. परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एस. बढे मॅडम यांनी केले. शेवटी सांस्कृतिक मंडळ प्रमुख सौ. वाय. एस. पाटील मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

No comments