adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन

 दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन   विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव : दिगंबर जैन सम...

 दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन  


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन काका गांधी (दादा) यांचे रविवार रोजी सायं. ५.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पुत्र श्रेयान्स जैन व विनोद जैन, तसेच कुटुंबीय असा मोठा परिवार आहे. ते प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉ. मयूर जैन व जळगावच्या नगरसेविका सौ. शुचिता अतुलसिंग हाडा यांचे मोठे काका होते. मोहन काका गांधी यांनी आपले संपूर्ण आयुष्य जैन धर्मसेवा, मुनीसेवा आणि समाजकार्य यासाठी समर्पित केले. अनेक दिगंबर जैन आचार्य व मुनीमहाराजांच्या सानिध्यात त्यांनी तत्त्वज्ञान, अनेकांतवाद यांचा सखोल अभ्यास केला. विविध ग्रंथांचे त्यांनी अनुवादही केले. त्यांच्या ज्ञान, वक्तृत्व आणि सेवाभावामुळे ते महाराष्ट्रासह देशभर परिचित झाले. प्रख्यात प्रवचनकार मुनीश्री तरुण सागरजी महाराज यांच्यासोबतही त्यांचा विशेष स्नेह होता. मुनीश्रींच्या विहारात अनेक ठिकाणी त्यांनी प्रभावी सूत्रसंचालन करून आपली वेगळी छाप निर्माण केली. त्यामुळे धरणगाव म्हणजे मोहन काका गांधी अशी ओळख समाजात निर्माण झाली होती. त्यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन अनेकांनी समाजसेवा व ट्रस्टचे कार्य पुढे नेले. त्यांच्या कार्याचा ठसा धरणगाव समाजावर कायम राहणार आहे. काकांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन! सोमवार दि. ३० मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघून तापाधडली अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments