आदिवासी विकास बहुउद्देशीय संस्था धुळे तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव.. धुळे/प्रतिनिधी - नरेंद्र रायसिंग मो...
आदिवासी विकास बहुउद्देशीय संस्था धुळे तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव..
धुळे/प्रतिनिधी - नरेंद्र रायसिंग मो. 8999838651
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धुळे:- येथील जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आदिवासी विकास बहुउद्देशीय संस्था, धुळे यांच्या तर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. या विशेष कार्यक्रमात कर्तबगार महिलांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेविका मा.सौ. सुरेखाताई उगले, व भारतीताई मासुळे, विशाखाताई वारुडे, कविता अहिरे, स्वाती चौधरी, पौर्णिमा निंबाळकर, रेखा मांडोरे, सपना पवार आदी पदाधिकारी उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या स्वयंसेविका उमा कोळवले, वैशाली पाचपुते, सुरेखा महाले, सुरेखा घाडगे, दीपा खळगे, मीना झिंबल, अनिता झेंडे, सुनंदा पाटील, अर्चना माळी, अश्विनी सोनार यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सदर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुनिता जगदीश मोहिते यांनी पुढाकार घेतला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या कार्याचा आदर करण्यासाठी संस्थेतर्फे अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

No comments