चोपडा नगरपरिषदेमुळे कामगारांना दिलासा; वेतनाचा प्रश्न सुटला, ‘कामबंद’ आंदोलन टळले चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा नगरप...
चोपडा नगरपरिषदेमुळे कामगारांना दिलासा; वेतनाचा प्रश्न सुटला, ‘कामबंद’ आंदोलन टळले
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा नगरपरिषदेत कंत्राटी (आऊटसोर्सिंग) कामगारांचे थकीत वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. त्यामुळे कामगारांनी दिलेला ‘कामबंद’ आंदोलनाचा इशारा मागे घेतला असून शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता यांसारख्या अत्यावश्यक सेवा सुरळीत राहणार आहेत. गेल्या ४ महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे कामगारांमध्ये नाराजी होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन माननीय आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी वेतनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील, मुख्याधिकारी रामनिवास झंवर तसेच सन्माननीय नगरसेवकांनी तत्काळ पुढाकार घेत ठेकेदाराशी चर्चा केली. नगरपरिषदेकडून ठेकेदाराला ३ महिन्यांचे बिल अदा करून कामगारांचे वेतन तात्काळ देण्याचे आदेश देण्यात आले.
या निर्णयामुळे कामगारांना दिलासा मिळाला असून त्यांनी आंदोलन मागे घेत पुन्हा कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी बांधकाम सभापती हुसेन खान पठाण, स्वच्छता सभापती रमेश शिंदे तसेच इतर नगरसेवकांनी कामगारांशी संवाद साधून परिस्थिती शांततेत सोडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील, मुख्याधिकारी रामनिवास झंवर व सन्माननीय नगरसेवकांनी सांगितले की, “पाणीपुरवठा व स्वच्छता या सेवा शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कामगारांच्या अडचणी समजून घेत त्यांना न्याय देणे ही आमची जबाबदारी आहे. प्रशासनावर दाखवलेला कामगारांचा विश्वास आम्ही कायम ठेवू ” या सकारात्मक निर्णयामुळे चोपडा शहरातील नागरिकांना कोणताही त्रास न होता सेवा सुरू राहणार आहेत

No comments