खामगावमध्ये रमजान ईद उत्साहात; राज्यमंत्री आकाश फुंडकर यांचा एकता व सद्भावनेचा संदेश पल्लवी पाटील खामगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) खामग...
खामगावमध्ये रमजान ईद उत्साहात; राज्यमंत्री आकाश फुंडकर यांचा एकता व सद्भावनेचा संदेश
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खामगाव:- येथे रमजान ईदच्या पावन पर्वानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने कामगार राज्यमंत्री आकाश दादा फुंडकर यांनी मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी म्हटले आहे की, “रमजान ईद हा मुस्लिम समुदायाचा अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सण आहे. या पवित्र सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा. ईद मुबारक!”
तसेच पुढे त्यांनी सांगितले की, “रमजान ईद हा एकता, शांती आणि सद्भावनेचा संदेश देणारा सण आहे. या निमित्ताने आपण सर्वांनी एकमेकांप्रती प्रेम, सहानुभूती आणि बंधुभाव जपावा, हीच खरी या सणाची शिकवण आहे.”
दरम्यान, खामगाव शहरात ईदच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत एकमेकांना शुभेच्छा दिल्या

No comments