लासुर येथे त्रिशा फाउंडेशन व बेहडे दंत हॉस्पिटल च्या संयुक्त विद्यमाने दंतचिकित्सा शिबिर संपन्न.. चोपडा प्रतिनिधी (संपादक :- हेमकांत गायकव...
लासुर येथे त्रिशा फाउंडेशन व बेहडे दंत हॉस्पिटल च्या संयुक्त विद्यमाने दंतचिकित्सा शिबिर संपन्न..
चोपडा प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
लासुर ता चोपडा येथे श्रीराम मंदिर च्या मागील सभागृहात त्रिशा फाउंडेशन चोपडा व बेहडे दंत हॉस्पिटल चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने दंतचिकित्सा शिबिर( दि. ५) रोजी गुरुवारी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या बीज महोत्सव निमित्ताने किसान विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ दंतचिकित्सक डॉ.सतीश बेहडे यांनी दातांची घ्यायची काळजी व त्यावरील उपचार याविषयी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. शिबिरात एकूण १५७ दातांची समस्या असणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. डॉ. कल्पेश बेहडे डॉ. लाठी यांनी रुग्णाची तपासणी केली. यावेळी अजय पालीवाल ,गोरख पाटील, विक्रम जावरे, देवीलाल बाविस्कर, डॉ.आर पी मंत्री, डॉ. राजेंद्र महाजन, डॉ.अशोक पाटील, ,प्रकाश पाटील, विनायक पाटील ,यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू महाराज यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. लाठी मॅडम यांनी केले..

No comments