*कूराण सार* *सुरह अलबलद* मक्काकालीन वचने -२० मी शपथ घेतो या मक्का शहराची आणि स्थिती अशी आहे की, हे पैगंबर (स.) या शहरात तुम्हाला वैध करून ...
*कूराण सार*
*सुरह अलबलद*
मक्काकालीन वचने -२०
मी शपथ घेतो या मक्का शहराची आणि स्थिती अशी आहे की, हे पैगंबर (स.) या शहरात तुम्हाला वैध करून घेतले गेले आहे. आणि शपथ घेतो आदम
अ. आणि त्यांच्या संततीची जी त्याच्यापासून जन्मली. वस्तुत: आम्ही मानवाला परिश्रमाने निर्माण केले आहे. काय त्याने असा समज करून घेतला आहे की, कोणीही त्याच्यावर वर्चस्व मिळवू शकणार नाही. म्हणतो की मी ढीगाने माल उधळले. काय तो समजतो की कुणी त्याला पाहिले नाही? काय आम्ही त्याला दोन डोळे, एक जिभ आणि दोन ओठ दिले नाहीत? आणि पुण्य व पापाचे दोन स्पष्ट मार्ग त्याला नाही का दाखवले? परंतु त्याने कठीण मार्गतून जाण्याचे धाडस
केले नाही. आणि तुम्हाला कल्पना नाही की काय आहे तो कठीण मार्ग एखाद्या मानवाला गुलामीतून मुक्त करणे, अथवा उपासमारीच्या दिवसात, एखाद्या
अनाथाला अथवा मातीत पडलेल्या गरिबाला जेवू घालणे. मग माणसाने त्या लोकात सामील व्हावे ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि ज्यांनी एकेकाला संयम आणि • दयेचा उपदेश दिला, हे लोक आहेत पुण्यवान. आणि ज्यांनी आमच्या या वचनांना
मानण्यास नकार दिला व दुष्कृत्य करीत राहिले ते आहेत पापी. त्यांना कयामतच्या दिवशी अग्नीत झोकून दिले जाईल (१-२०)
*अब्दुल सरदार पटेल*

No comments