तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला..चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; गंभीर जखमी तरुण रुग्णालयात दाखल सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकव...
तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला..चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; गंभीर जखमी तरुण रुग्णालयात दाखल
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:-शहरातील बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर येथे किरकोळ कारणावरून एका तरुणावर लोखंडी कोयता व लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चौघां विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार,बोल्हेगाव येथील रहिवासी लक्ष्मण काशिद यांची मुलगी घराबाहेर सायकल खेळत असताना दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून हा वाद उद्भवला.या घटनेचा जाब विचारण्यासाठी काशिद हे आरोपींकडे गेले असता आरोपींनी त्यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करत वाद वाढवला. त्यानंतर हा वाद विकोपाला जाऊन आरोपींनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
याच वेळी आरोपी सिद्धेश घोडके याने लोखंडी कोयत्याने काशिद यांच्या डोक्यावर व अंगावर वार करत त्यांना गंभीर जखमी केले. तसेच दांडक्यानेही मारहाण करण्यात आली.या हल्ल्यात काशिद गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून तोफखाना पोलिसांनी सिद्धेश घोडके,दिनेश बुरकुले,उमा बुरकुले आणि सिद्धेश बुरकुले यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.पुढील तपास तोफखाना पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण करीत आहेत.

No comments