श्री. डी.बी. आबा पाटील यांना ‘पं. नेहरू राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:...
श्री. डी.बी. आबा पाटील यांना ‘पं. नेहरू राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- येथील जे.डी.सी.सी. बँकेत कार्यरत असताना अत्यंत सहकार्यशील व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख निर्माण करणारे निवृत्त माजी विभागीय व्यवस्थापक श्री. डी.बी. आबा पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व सहकारी क्षेत्रातील कार्याची दखल घेत ‘पंडित जवाहरलाल नेहरू राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. तुबा नाज हेल्प मल्टिपर्पज सोसायटी, ता. यावल या संस्थेतर्फे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला जात असून, जळगाव येथे आयोजित सोहळ्यात उद्या मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (सरदार सरोवर प्रकल्प, नंदुरबार) श्री. मनोज देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
श्री. डी.बी. आबा पाटील यांनी आपल्या सेवाकाळात सहकार्यशील वृत्ती, मैत्रीपूर्ण स्वभाव आणि समाजाशी जुळलेली नाळ यामुळे मोठा मित्रपरिवार निर्माण केला आहे. त्यांनी नेहमीच गरजू व सर्वसामान्यांना मदतीचा हात देत समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. खान्देशात विधायक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अमर संस्था, चोपडा येथे कार्यकारिणी संचालक म्हणून तसेच समस्त दोडे गुर्जर समाज संस्थान, जळगावच्या विश्वस्त मंडळावर विश्वस्त म्हणूनही ते सक्रिय आहेत. त्यांच्या या सर्वांगीण कार्याची दखल घेत हा चौथा गौरव पुरस्कार त्यांना प्रदान केला जात आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments