“सावेडीतच होणार लग्नाची नोंदणी?”शहर विस्ताराचा वेग पाहता सावेडीत स्वतंत्र विवाह नोंदणी कार्यालयाची नगरसेवक रेवणनाथ पवार यांची मागणी.. महा...
“सावेडीतच होणार लग्नाची नोंदणी?”शहर विस्ताराचा वेग पाहता सावेडीत स्वतंत्र विवाह नोंदणी कार्यालयाची नगरसेवक रेवणनाथ पवार यांची मागणी.. महापालिका प्रशासनाची सकारात्मक भूमिका
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:-शहराचा झपाट्याने वाढणारा विस्तार आणि सावेडी उपनगरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता सावेडीतच महापालिकेचे स्वतंत्र विवाह नोंदणी कार्यालय सुरू करावे, अशी ठाम मागणी नगरसेवक रेवणनाथ पवार यांनी केली आहे.
विवाह नोंदणीचे एकमेव कार्यालय जुन्या महापालिका इमारतीतच.नागरिकांना लांबून प्रवास करावा लागतो.सावेडी परिसरात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली.
उपनगरातील नागरिकांसाठी स्वतंत्र सुविधा आवश्यक आहे.नगरसेवक रेवणनाथ पवार यांनी महापौर ज्योतीताई गाडे,
उपमहापौर धनंजय जाधव
आणि आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी सादर केली.यावेळी किरण निकम,सुरज चांदगुडे,सौरभ जरे, नवनाथ पवार,योगेश आजबे आदी उपस्थित होते.निवेदनावर सकारात्मक भूमिका घेत महापौर,उपमहापौर आणि आयुक्त यांनी सावेडी उपनगरात स्वतंत्र विवाह नोंदणी कार्यालय लवकरच सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले.विवाह नोंदणीसाठी लांबचा प्रवास आणि रांगा संपणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments