adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कृष्ण–सुदामा सामाजिक समरसतेचे प्रतीक : नागेश महाराज आगलावे

 कृष्ण–सुदामा सामाजिक समरसतेचे प्रतीक : नागेश महाराज आगलावे  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) तेल्हारा – कृष्ण आणि सुदामा ...

 कृष्ण–सुदामा सामाजिक समरसतेचे प्रतीक : नागेश महाराज आगलावे 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

तेल्हारा – कृष्ण आणि सुदामा या केवळ पौराणिक व्यक्तिरेखा नसून सामाजिक समरसतेचे जिवंत उदाहरण आहेत. समाजातील एक घटक गरीब तर दुसरा श्रीमंत असला, तरी परस्परांतील समानता जपत एकमेकांच्या कार्यात सहभागी व्हावे, असा संदेश या कथेतून मिळतो, असे प्रतिपादन हरिभक्त परायण नागेश महाराज आगलावे यांनी उकळी येथे केले.

पातुर्डा जवळील उकळी बाजार येथे मागील आठ दिवसांपासून भागवत कथा सप्ताह सुरू असून, त्यामध्ये नागेश महाराज आगलावे भागवताच्या माध्यमातून श्रोत्यांना मार्गदर्शन करीत आहेत. महाभारत या ग्रंथातील कृष्णाच्या जीवनावर आधारित प्रवचन करताना त्यांनी सांगितले की, कृष्णाचे जीवन हे संघर्षमय होते. जन्मत:च बंदिवास, बालपणापासून विविध संकटांचा सामना—अशा अनेक अडचणी असूनही त्यांच्या चेहऱ्यावर कधीही दुःख दिसत नाही. 


मानवानेही जीवनात कितीही अडचणी आल्या तरी त्या चेहऱ्यावर न आणता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. प्रत्येक घटना ही दैनंदिन जीवनाचा एक भाग समजून शांतपणे सामोरी जावे. समस्या मनाला लावून घेतल्यास जीवनमान खालावते आणि घरातील वातावरण बिघडते. म्हणून कर्त्या व्यक्तीने अडचणींना संयमाने आणि सकारात्मकतेने सामोरे जाणे आवश्यक आहे, असा संदेश त्यांनी दिला.

दरम्यान, पातुर्डा येथील ‘हर हर महादेव’ समूहाच्या वतीने उकळी बाजार येथे भेट देऊन नागेश महाराज आगलावे यांचा सत्कार करण्यात आला. होळीच्या निमित्ताने पातुर्डा येथील सदस्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ, मराठी पत्रकार परिषद केंद्रीय जिल्हा सदस्य श्याम देशमुख, माजी मुख्याध्यापक महादेव राऊत, विजू अण्णा वानखेडे, समिती अध्यक्ष प्रकाश देशमुख, गोपाल उमाळे, गजानन करांगळे, अमित भोंगळ आदी मान्यवर उपस्थित होते.

भागवत सप्ताहादरम्यान रंगपंचमी अर्थात गोकुळातील होळी या प्रसंगावर महाराजांनी विशेष प्रवचन केले. होळी ही केवळ लाकडाची नसून वाईट विचारांची असावी, तर धुळवड ही केवळ रंगांची नसून आयुष्यात सकारात्मक रंग भरणारी असावी, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन राम कृष्ण हरी महिला भजनी मंडळ, जय हनुमान स्वामी विवेकानंद युवा मंडळ, उकळी बाजार यांच्या सहकार्याने उकळी गावकळी मंडळाने केले होते. कार्यक्रमास ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली.

No comments