adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जि.प.शाळा नायगाव येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत

 जि.प.शाळा नायगाव येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत    नायगाव ता. यावल प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)    जिल्हा परिषद  उच्च प्राथमिक श...

 जि.प.शाळा नायगाव येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत   


नायगाव ता. यावल प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

   जिल्हा परिषद  उच्च प्राथमिक शाळा नायगाव तालुका यावल येथे शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठीत करण्यात आली. मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा 2009 नुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत दर दोन वर्षांनी व्यवस्थापन समिती पुनर्गठीत करण्यात येते, यानुसार शाळेच्या विद्यार्थ्यांचे माता-पालकांची सभा आयोजित करण्यात आली.     सदर सभेतून शाळा व्यवस्थापन समितीसाठी सदस्यांची निवड करण्यात आली.इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गातील वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांची शाळा व्यवस्थापन समितीमध्ये निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीच्या निकषानुसार 75 टक्के पालकांमधून सदस्यांची निवडकरण्यात आली. यानुसार अनुसूचित जमाती  (एस.टी प्रवर्ग) विद्यार्थी संख्या जास्त असल्याने पाच सदस्य निवड करण्यात आले. ते खालील प्रमाणे सरफराज जुम्मा तडवी (रेहान सरफराज तडवी इ.पाचवी), असलम अमीर तडवी (अल्फिया असलम तडवी इ.तिसरी),रेहाना फिरोज तडवी (माहीर फिरोज तडवी इ. पहिली),अकिला अफजल तडवी (आलिया अफजल तडवी इ.सहावी), जाकीरा विनोद तडवी (आरजू विनोद तडवी इ.सातवी),अनुसूचित जाती प्रवर्गातून अक्षय मधुकर सपकाळे यांची निवड करण्यात आली. ओबीसी प्रवर्गातून विलास धोंडू मिस्तरी(उपासना विलास मिस्तरी इ. तिसरी) तसेच ज्योती नेमीचंद मिस्तरी (भावेश नेमीचंद मिस्तरी इ. दुसरी )यांची निवड करण्यात आली.एस.बी.सी महिला प्रवर्गातून निराशा गोरखनाथ कोळी (हर्षल गोरखनाथ कोळी इयत्ता पहिली )यांची निवड करण्यात आली.तसेच शिक्षण प्रेमी म्हणून विजय छगन गोसावी यांची निवड करण्यात आली,तसेच शिक्षक प्रतिनिधी म्हणून भरत भिमराव शिरसाठ उपशिक्षक यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. स्थानिक स्वराज्य प्रतिनिधीतून प्रशासक असल्याने सध्या हे पद रिक्त ठेवण्यात आलेले आहे, सदस्य सचिव म्हणून ग्रेडेड मुख्याध्यापक निवृत्ती गोपाळ भिरूड यांची सदस्य सचिव म्हणून निवड करण्यात आली. या समितीमध्ये निवड झालेल्या सदस्यातून अध्यक्षपदी सरफराज जुम्मा तडवी तसेच उपाध्यक्ष म्हणून निराशा गोरखनाथ कोळी यांची निवड करण्यात आली. यावेळी सूत्रसंचालन श्री सुरेश राघो खुनेपिंप्रे  उपशिक्षक यांनी केले.प्रास्ताविक भरत भिमराव शिरसाठ यांनी केले. शेवटी खेळीमेळीच्या वातावरणात शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली व सर्वांचे आभार ग्रे.मुख्याध्यापक निवृत्ती गोपाळ भिरूड यांनी मानले. समिती गठित करण्यासाठी शाळेतील पदवीधर शिक्षक राजेंद्र हिम्मतराव पारधी, भारती गुलाबराव पाटील, ललिता वामन माळी,नजमा इंसान तडवी,मालसिंग जंगलू भुगवाड्या,मधुकर संतोष मगरे, भटराज रमेश शिरसाठ,किशोर भटू पाटील यांनी सहकार्य केले.

No comments