अखेर अक्षय पाटील यांच्या आक्रमक आंदोलनामुळे बोराळा बु.येथील शेतकऱ्यांना मीळाली नवीन डि.पी. ...! आंदोलना दरम्यान उडवा-उडवीचे उत्तरे देणाऱ्या...
अखेर अक्षय पाटील यांच्या आक्रमक आंदोलनामुळे बोराळा बु.येथील शेतकऱ्यांना मीळाली नवीन डि.पी. ...!
आंदोलना दरम्यान उडवा-उडवीचे उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांना रविकांत तुपकर यांनी घेतले होते धारेवर....!
जळगाव जा. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव (जा.) :- तालुक्यातील ग्राम बोराळा बु.या शिवारामध्ये महावितरने ६३ चा टान्सफार्मर लावलेला असुन जास्त लोडमुळे हा टान्सफार्मर खुप वेळेस जळत होता.
सदर टान्सफार्मर खुप वेळस जळत असल्यामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत होता. नेहमी-नेहमी होत असलेला त्रास शेतकरी संबंधित अधिकाऱ्यांना सांगत होते मात्र अधीकारी ऐकून घ्यायला तायारच नव्हते उलट त्यांच्या मनमानी व उद्धट वागवणुकीचा प्रचंड त्रास शेतकऱ्यांनाच सहन करावा लागत होता तसेच हाता तोंडाशी आलेल्या गहु,हरभरा, कांदा व इतर पिकांना पाणी देता येत नव्हते.
या सर्व विषयाला त्रस्त होत शेतकऱ्यांनी युवा आंदोलक अक्षय पाटील यांना झालेल्या सर्व विषयाची माहीती दिली असता अक्षय पाटील यांनी दिनांक ९/३/२०२६ रोजी लगेचच शेतकऱ्यांना सोबत घेऊन जळगाव जामोदचे महावितरण कार्यालय गाठले व कार्यालयातच ठिय्या आंदोलन चालु केले ही माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना कळताच त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले त्यानंतर ३ तास चालू असलेल्या आंदोलनात मलकापुर येथील कार्यकारी अभियंता मीश्रा साहेब यांनी नवीन १०० चा टान्सफार्मर बसवुन देण्याचे सांगितले त्यांनतर आंदोलन स्थगित करण्यात होते व त्यानंतर नवीन १०० चा ट्रांसफार्मर बसवण्यात आला. सदर आंदोलनात शेतकरी अशोक राखुंडे,क्रांतिकारीचे शहराध्यक्ष अजय गिरी,अनिलसिंह राजपुत,शिवदास खिरोडकार,वैभव जाणे, आकाश आटोळे,अमोल बहादरे,त्रीलोकसिह राजपुत,सागर वाघ,विजय रायपुरे,गणेश तायडे,सदाशिव जाणे तसेच मोठ्या सखेने शेतकरी उपस्थित होते.


No comments