कुटीर रुग्णालय पारोळा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यावर विभागीय चौकशीचे आदेश डॉ.स्वप्निल सांगळे जिल्हा शैल्य चिकित्सक, जळगाव, यांचे आदेश जळगाव ...
कुटीर रुग्णालय पारोळा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यावर विभागीय चौकशीचे आदेश
डॉ.स्वप्निल सांगळे जिल्हा शैल्य चिकित्सक, जळगाव, यांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) –
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जिल्हा रुग्णालय जळगाव येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून वैद्यकीय अधिकारी, कुटीर रुग्णालय पारोळा यांच्या कथित बेकायदेशीर कामकाजाबाबत गंभीर आरोपांची दखल घेण्यात आली असून त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दिनेश कडु भोळे, रा. जळगाव यांनी दिनांक ०५ जानेवारी २०२६ रोजी सादर केलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने तसेच उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ यांच्या दिनांक ०५ मार्च २०२६ च्या पत्रानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित तक्रारींची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आणि सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी अधिकृत चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीत डॉ. सतिष व्ही. टाक (वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय पाचोरा) यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून डॉ. प्रकाश ताळे (वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय अमळनेर) आणि श्री. रविंद्र अमृतकर (कार्यालयीन अधीक्षक, जिल्हा रुग्णालय जळगाव) यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. चौकशी समितीला संबंधित प्रकरणातील सर्व कागदपत्रांची तपासणी, संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदविणे आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा सखोल अभ्यास करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल ७ दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून चौकशी अहवालानंतर पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments