रामनवमी च्या शुभ मुहूर्तावर स्वातीताई देशमुख खर्चे यांनी एक लाख वेळा रामनाम लिहून प्रभू श्रीराम चरणी केले अर्पण अमोल बावस्कार बुलढाणा (संप...
रामनवमी च्या शुभ मुहूर्तावर स्वातीताई देशमुख खर्चे यांनी एक लाख वेळा रामनाम लिहून प्रभू श्रीराम चरणी केले अर्पण
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- राम राम' किंवा 'रामनाम' लिहिणे ही सनातन धर्मातील एक अत्यंत प्रभावशाली आध्यात्मिक साधना आहे,ज्यामुळे मन शांत होते, एकाग्रता वाढते आणि आध्यात्मिक उन्नती होते लिहिलेले नाव हे जप करण्यापेक्षा १०० पट अधिक पुण्य देते असे मानले जाते यामुळे मनातील चुकीचे विचार दूर होऊन मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते राम नाम लिहिताना मन एकाग्र राहते,ज्यामुळे इंद्रियांवर नियंत्रण राहते आणि मानसिक प्रसन्नता मिळते रामनाम वही लिहिताना लिहिणाऱ्याच्या हातून श्रवण, मनन आणि लेखन अशी 'नवविधा भक्ती' सहज घडते
थोडक्यात, राम नाम लिहिणे हे केवळ धार्मिक कृत्य नसून ते मानसिक आरोग्य आणि आत्मिक शांती मिळवण्याचा एक सोपा मार्ग आहे तसेच हिंदू धर्मात राम नावाचे खूप महत्त्व आहे रामनाम घेतल्याने जीवन संसाराची नौका पार लागते असे म्हणतात मनाची एकाग्रता होते मन शांत राहते रामनामाची ओढ लागते म्हणून मरण शय्येवर असतांना सुद्धा रामनाम घेण्याचे महत्त्व आहे.जुन्या काळातील लोकं रामनाम तोंडात सदैव असावे यासाठी आपल्या मुलाचे नाव राम ठेवत असत कि जेणेकरून मृत्यूसमयी तोंडात रामनाम यावे या वरील विषयाची साधना करत मलकापूर येथील स्वातीताई देशमुख खर्चे यांनी श्रीराम नवमी शुभ मुहूर्तावर एक लाख राम नाम लिहून श्री राम चरणी अर्पण केले.

No comments