सावद्यातील दुध डेअरी तून विदेशी दारू जप्त! डेअरीत बेकायदेशीर दारू विक्रीचा पर्दाफाश सावदा पोलीसांची कारवाई रावेर मुबारक तडवी (संपादक -:-...
सावद्यातील दुध डेअरी तून विदेशी दारू जप्त! डेअरीत बेकायदेशीर दारू विक्रीचा पर्दाफाश सावदा पोलीसांची कारवाई
रावेर मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सावदा तालुका रावेर येथील सहकारी दुध संस्थेमध्ये विनापरवाना अनधिकृत बेकायदेशीरपणे विदेशी दारू विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत हा गैरप्रकार उघडकीस आला आहे सावदा पोलिसांनी तत्परतेने छापा टाकून कारवाई केली आहे. दि. 25 मार्च 2026 रोजी सहकारी दुध डेअरी तून अवैध दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना कळाली की सावदा येथील सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या इमारतीच्या मागील खोलीत एक इसम विदेशी दारू विक्रीसाठी साठा करून ठेवत आहे. मिळालेल्या या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी दोन पंचांसमक्ष छापा टाकला.सावदा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये डेअरीच्या किचन रूममध्ये ठेवलेल्या एका बॉक्समधून 13,500 रुपयांच्या किमतीच्या 750 एमएलच्या 9 सिलबंद विदेशी दारूच्या (बंपर) बाटल्या जप्त केल्या या प्रकरणी सावदा सहकारी दुध उत्पादक संस्थेतील क्लर्क नितीन रामकृष्ण बेंडाळे (वय 46, रा. सावदा, ता. रावेर याने विक्रीसाठी दारू आणल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्याच्याविरुद्ध सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 76/2026 नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (ई) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ उमेश पाटील करीत आहे
या पोलीस पथकाने केली कारवाईसावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोउनि अमोल गर्जे, पोहेकॉ उमेश पाटील, पोना जाकीर मन्सुरी आणि पोकॉ मयूर पाटील यांनी केली.



No comments