*CSR फंडातून तालसवाडा येथे संगणक कक्ष उद्घाटन सोहळा व 100% पटनोंदणी व प्रवेश उत्सव* मलकापूर प्रतिनिधी :- (संपादक :- हेमकांत गायकवाड) जि...
*CSR फंडातून तालसवाडा येथे संगणक कक्ष उद्घाटन सोहळा व 100% पटनोंदणी व प्रवेश उत्सव*
मलकापूर प्रतिनिधी :-
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
जि प मराठी उच्च प्राथमिक शाळा तालसवाडा पं.स. मलकापूर जि. प. बुलढाणा येथे WTEs Foundation च्या DIRECTOR सौ वेदिका ताई विनोद भोळे यांनी तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी उंच भरारी घेऊ शकतील त्यांना लहानपणापासून संगणकीय शिक्षणाचे धडे मिळावेत हा उदात्त हेतू समोर ठेवून शाळेला 5 संगणक संच अद्यावत फर्निचर सह उपलब्ध करून दिले.श्री विनोद भोळे व श्री प्रसाद कुलकर्णी यांच्या उदात्त सहकार्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होऊन डिजिटल शिक्षणाची नवी दारी खुली झाली आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि ते भविष्यात तंत्रज्ञानाच्या युगात सक्षमपणे पुढे जावेत या हेतूने त्यांनी केलेले योगदान प्रेरणादायी आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाला नवै पंख मिळाले.तालसवाडा गावातील स्व. पांडुरंग नामदेव खाचणे ( माजी शिक्षक) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे सुपुत्र सतिश खाचणे यांच्याकडून श्री. रामभाऊ खाचणे यांच्या पुढाकारातून शाळेचे मुख्याध्यापक श्री गजानन खर्चे सर यांच्या कल्पनेला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी शाळेला भव्य प्रवेशद्वार बांधून देण्याचे ठरविले व कामाचा शुभारंभ केला.शाळेतील इयत्ता पहिलीतील 100% दाखल पात्र विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून त्यांना फेटे बांधून गुलाबपुष्प व वस्तू भेट देऊन प्रवेश शुभारंभ करण्यात आला.
मलकापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री.एन जे फाळके साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री एन बी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून हा कार्यक्रम साकारला.
या कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख श्री शेखर खर्चे सर, शाळेतील शिक्षक निलिमा फिरके, माधुरी खर्चे, रूपल पाटील, भागवत पटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष भाऊ क्षीरसागर उपाध्यक्ष माधुरी शेगोकार व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच शुभांगी ताई विजय कोलते उपसरपंच अश्विन साठे व सदस्य ,ग्रामसेवक सचिन पाटील, तलाठी सविता गायकवाड, आसटकर सर, गावित सर या सर्वाचे सहकार्य लाभले...

No comments