adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नूतन विद्यालयात 'STEM सखी', व 'आरोग्य सखी' उपक्रम उत्साहात संपन्न.

 नूतन विद्यालयात 'STEM सखी', व 'आरोग्य सखी' उपक्रम उत्साहात संपन्न. मलकापूर प्रतिनिधी:- (संपादक :- हेमकांत गायकवाड) स्थानिक ...

 नूतन विद्यालयात 'STEM सखी', व 'आरोग्य सखी' उपक्रम उत्साहात संपन्न.



मलकापूर प्रतिनिधी:-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


स्थानिक नूतन विद्यालय येथे 'STEM सखी' विज्ञान प्रदर्शन आणि 'आरोग्य सखी' उपक्रमाचे अतिशय दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा आणि त्यांच्या आरोग्याप्रति जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने एमएनवाय कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड यांनी "बेटी बचाव बेटी पढाव या संकल्पनेतून" आयोजित या सोहळ्याला मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.

​विज्ञानाचा आविष्कार आणि आरोग्य जागर ​कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी ७:०० वाजता मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी विद्यार्थिनींनी STEM (Science, Technology, Engineering, Maths) विषयावर आधारित विविध नाविन्यपूर्ण प्रयोगांचे सादरीकरण केले. ड्रोन तंत्रज्ञान, पर्यावरण पूरक ऊर्जा स्रोत आणि रोबोटिक्स अशा विषयांवरील प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. त्याचबरोबर 'आरोग्य सखी' उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींची,  आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्या आरोग्य तपासणी करण्यात आली.

​मान्यवरांचे मार्गदर्शन ​कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. गोपाळ दर्जी सर (संस्थापक, दर्जी फाउंडेशन जळगाव खा.) यांनी विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षा आणि विज्ञानातील करिअर संधींविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. मा. सौ. प्रियांका मगर-काळे, (उपप्रादेशिक, परिवहन अधिकारी, बुलढाणा जिल्हा) यांनी महिला सुरक्षा आणि जिद्दीने यश संपादन करण्याबाबत आपले विचार मांडले. तसेच मा. सौ. स्नेहल माने-साळुंके (बुलढाणा जिल्हा जलसंधारण अधिकारी) यांनी प्रशासकीय सेवा व महिला सक्षमीकरणावर प्रकाश टाकला. डॉ. सौ. तेजस्विनी जतकर यांनी मुलींना आरोग्याची काळजी घेण्याबाबत शास्त्रीय माहिती दिली. प्रा. अल्का जाधव यांनी शैक्षणिक धडे दिले. 

​विशेष गौरव व सत्कार ​या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे शिक्षण क्षेत्रात ३४ वर्षे अविरत सेवा देणारे, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे सचिव व 'आदर्श शिक्षक' श्री. संजय दिनकर पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त भावपूर्ण सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

जि. प. शाळा-आळंद, यशोधाम पब्लिक स्कूल, तथा डीईएस हायस्कूल धरणगाव यांनी विज्ञान प्रदर्शनी मध्ये क्रमांक पटकावला तसेच पद्मश्री व्हि. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय येथील विद्यार्थिनींनी विविध प्रात्यक्षिके केली.

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन जि. प. शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास विभाग बुलढाणा, गोदावरी फाउंडेशन, दर्जी फाउंडेशन जळगाव खा., एमएनवाय कन्सल्टिंग प्रा. ली. यांचे कर्मचारी वृंद तथा श्री. दिपक चांभारे पाटील, श्री. अविनाश बोरले सर, श्री. आर. आर. पाटील सर, श्री. सचिन पाटिल सर, राजेंद्र काजळे, चेतन चोपडे, अमित पाटील, मोहन बावस्कर, दिपक नाफडे, निसार शेख व सहकारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. रुपाली पाटील यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले. या प्रदर्शनासाठी सर्व शाळेतील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मोठी गर्दी केली होती...

No comments