adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वाभिमानीचा दणका कलकत्ता DP (वाघूड) येथे ट्रान्सफॉर्मर बसवले

 स्वाभिमानीचा दणका कलकत्ता DP (वाघूड) येथे ट्रान्सफॉर्मर बसवले  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर:-  वाघूड शिवाराती...

 स्वाभिमानीचा दणका कलकत्ता DP (वाघूड) येथे ट्रान्सफॉर्मर बसवले 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर:-  वाघूड शिवारातील कलकत्ता DP येथे गेल्या ८ दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शेती पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली होती. या समस्येबाबत शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत कार्यकारी अभियंता तायडे साहेब यांच्या कडे पाठपुरावा केला. 


संघटनेच्या दणक्यानंतर अखेर कलकत्ता DP (वाघूड) येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला. ट्रान्सफॉर्मर बसवताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे जिल्हा उपाध्यक्ष बाळू भाऊ ठाकरे तसेच तालुका उपाध्यक्ष गोपाल भाऊ सातव या सहित शिवारातील शेतकरी उपस्थित होते.

No comments