adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शहीद जवानाच्या कन्येच्या विवाहात 202 कोब्रा युनिटची मानाची उपस्थिती; अभिमानास्पद व भावनिक सोहळा

 शहीद जवानाच्या कन्येच्या विवाहात 202 कोब्रा युनिटची मानाची उपस्थिती; अभिमानास्पद व भावनिक सोहळा   शामसुंदर सोनवणे वि.प्र. (संपादक -:- हेमका...

 शहीद जवानाच्या कन्येच्या विवाहात 202 कोब्रा युनिटची मानाची उपस्थिती; अभिमानास्पद व भावनिक सोहळा  


शामसुंदर सोनवणे वि.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा :- तालुक्यातील कुसुंबा येथिल शहीद जवान विलास आत्माराम कोळी यांच्या ज्येष्ठ कन्या चि. सौ. का. रोशनी विलास कोळी यांचा विवाह चि. राजेश साळुंखे यांच्याशी चोपडा येथील परिश्रम मंडपम मंगल कार्यालयात अत्यंत उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झाला.

या विवाह सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे शहीद विलास कोळी ज्या 202 कोब्रा युनिटमध्ये कार्यरत होते, त्या युनिटचे जवान स्वतः युनिफॉर्ममध्ये उपस्थित राहून नववधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी तसेच कन्यादानासाठी सहभागी झाले. त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण वातावरण अभिमानाने भारावून गेले.


202 कोब्रा युनिटचे कमांडेंट श्री. अमित कुमार यांच्या वतीने नववधू रोशनी कोळी यांना कन्यादान स्वरूपात ₹1,51,000 चा धनादेश त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. तसेच विविध उपहारही जवानांमार्फत प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित जवानांमध्ये श्री. विक्रम सिंह (सब-इन्स्पेक्टर), श्री. गवळी शेख सुभान (हवालदार मेजर), श्री. करंकाळ कोमल संजय (शिपाई/जी.डी.) व श्री. प्रताप पावरा (शिपाई/जी.डी.) यांचा समावेश होता.


शहीद जवानाच्या कुटुंबाप्रती 202 कोब्रा युनिटने दाखवलेली ही आत्मीयता, कर्तव्यनिष्ठा आणि सन्मानाची भावना पाहून उपस्थित नागरिक भावूक झाले. या अनोख्या विवाह सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू असून, कमांडेंट अमित कुमार व त्यांच्या संपूर्ण पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 




No comments