कुंड खु होणार भक्तीचे माहेरघर २ ते २० मे दरम्यान वारकरी बालसंस्कार शिबीराचे आयोजन अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकाप...
कुंड खु होणार भक्तीचे माहेरघर
२ ते २० मे दरम्यान वारकरी बालसंस्कार शिबीराचे आयोजन
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- वारकरी येणाऱ्या कलीयुगात कुठेतरी वारकरी सांप्रदायाचा वारसा संताचे आचार विचार थोर पुरुष यांचे विचार अविरत पणे चालावे या उद्देशातून येणाऱ्या 2 मे 2026 ते 20 मे 2026 या कालावधीत कुंड खु मलकापुर येथे वारकरी बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे या आयोजित बालसंस्कार शिबीरामध्ये मृंदंग,गायन,पाऊली,टाळ,श्लोक विषय शिकविले जाणार असून 15 ते 18 या तारखेत किर्तन महोत्सव देखील आयोजित करण्यात येणार आहे.व पर्यावरणाचा विचार करत आजची काळाची गरज झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम देखील शिबीरामध्ये राबविण्यात येणार आहे. असे शिबीराचे आयोजक ह.भ.प नयन महाराज कुंड खु व ह.भ.प युवाकिर्तनकार ह.भ.प.पुनमताई भोलनकर यांनी सांगीतले आहे. या शिबिरात सर्व गावकरी मंडळीचे सहकार्य लाभत आहे व मनामनात भक्ती भावाचे वातावरण तयार झाले आहे.

No comments