बामणोद, राजोरा रस्ता मोजतोय शेवटची घटका, नादुरूस्त रस्ता दुरूस्तीची मागणी भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : तालुक्यातील ब...
बामणोद, राजोरा रस्ता मोजतोय शेवटची घटका, नादुरूस्त रस्ता दुरूस्तीची मागणी
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : तालुक्यातील बामणोद येथून राजोरा जाणाऱ्या रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे हा रस्ता आता शेवटची घटका मोजतांना दिसत आहे तेव्हा हा रस्ता दुरूस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे
तालुक्यातील अतिशय महत्त्वाचा असलेला बामणोद राजोरा हा रस्ता ची अवस्था अतिशय दयनीय झालेली असून जळगावला शेळगाव मार्गे जाण्याचा हा महत्त्वाचा मार्ग असून या रस्त्याने बऱ्याच प्रमाणावर मोठी वर्दळ असते प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत दहा वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण झालेलं होतं त्यानंतर मेंटेनन्स संपल्यानंतर रस्त्याचे हाल अतिशय खराब झालेले आहे. तालुक्यातील महत्त्वाच्या पाच गावांना जोडणारा व जळगावला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग मोठे मोठे खड्डे पडल्यामुळे व खडी निघाल्यामुळे तुमचा की धारकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चिखली बुद्रुक व खुर्द मध्ये पुलाचा भाग अतिशय दयनीय अवस्थेत असून पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तेथे पाणी साचते व त्या पाण्याचा निसरा न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल जमा होतो.या रस्त्याने बामणोद ,म्हैसवाडी, चिखली खुर्द, बुद्रुक राजोरा व पुढे बोरावल, टाकरखेडा मार्गे शेळगाव बॅरेज कडून जळगाव रस्ता आहे. हा अतिशय सोपा व कमी रहदारीचा रस्ता असल्यामुळे प्रवाशांची पहिली पसंती या मार्गाला असते. परंतु सोयीचा असलेला हा मार्ग शेवटच्या घटका मोजत असून मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांचे हाल होत आहे. दुचाकी घसरून जखमी होण्याचे मोठ्या प्रमाणावर घटना घडत आहे.स्थानिक लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे ही मागणी जनतेमधून होत आहे.
काटेरी झुडपे वाढले,साईडपट्ट्या खराब
या रस्त्याच्या कडेला मोठया प्रमाणात काटेरी झुडपे वाढल्यामुळे समोरून येणारी वाहन सुद्धा दिसायला अडचण येते व परिणामी अपघाताची शक्यता निर्माण होते त्याच प्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या साईट पट्ट्या प्रचंड मोठ्या प्रमाणात नादुरूस्त व मुळ रस्त्यापासुन खोल झाल्याने वाहन उलटण्याची भिती येथे सतत असते
No comments