adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अफवांना बळी पडू नका; चोपडा तालुक्यात इंधनाचा पुरेसा साठा – प्रशासनाचे आवाहन

 अफवांना बळी पडू नका; चोपडा तालुक्यात इंधनाचा पुरेसा साठा – प्रशासनाचे आवाहन  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:-  सध्या आख...

 अफवांना बळी पडू नका; चोपडा तालुक्यात इंधनाचा पुरेसा साठा – प्रशासनाचे आवाहन 

चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा:-  सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर चोपडा तालुक्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा काही ठिकाणी पसरत आहेत. या अफवांमुळे तालुक्यातील गॅस एजन्सी व पेट्रोल पंपांवर नागरिकांची अनावश्यक गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, चोपडा तालुक्यात गॅस सिलेंडर, पेट्रोल व डिझेलचा साठा सध्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. सर्व गॅस एजन्सी व पेट्रोल पंप चालकांना इंधन पुरवठा नियमित ठेवण्याबाबत प्रशासनाकडून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, दिनांक १३ मार्च २०२६ रोजी सर्व संबंधितांची बैठक घेऊन याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव यांच्या ४ एप्रिल २०२६ च्या निर्देशानुसार, गॅस सिलेंडर बुकिंगनंतर पुढील ३ ते ४ दिवसांत घरपोच दिले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गॅस एजन्सीवर गर्दी करण्याऐवजी घरपोच सेवेचा लाभ घ्यावा, असेही प्रशासनाने आवाहन केले आहे. तालुक्यात कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा नसताना अफवांमुळे निर्माण होणारी घबराट टाळणे गरजेचे आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन शेवटी करण्यात आले आहे.

No comments