यावल महाविद्यालयात महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन.. भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक ...
यावल महाविद्यालयात महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन..
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ एस आर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एम डी खैरनार यांनी महात्मा फुले व्यक्तीमत्व आणि विचारांचा थोडक्यात परिचय करून दिला. अध्यक्षीय मनोगतात डॉ एस आर गायकवाड यांनी महात्मा फुले भारतीय इतिहासात समाजक्रातींचे प्रणेते आणि स्री शिक्षणाचे जनक म्हणून अजरामर राहतील असे सांगितले. सुत्रसंचलन प्रा संतोष जाधव यांनी तर आभार प्रदर्शन प्रा इमरान खान यांनी केले.. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ हेमंत भंगाळे, प्रा पी व्ही पावरा, श्री मिलिंद बोरघडे यांच्यासह प्राध्यापक प्राध्यापिका, आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

No comments