adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उमर्टी गावाजवळ सापळा रचून कारवाई; पिस्तुल, जिवंत काडतुसे व मोटारसायकल जप्त

 उमर्टी गावाजवळ सापळा रचून कारवाई; पिस्तुल, जिवंत काडतुसे व मोटारसायकल जप्त  जळगाव प्रतिनिधी : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्ह्यात ...

 उमर्टी गावाजवळ सापळा रचून कारवाई; पिस्तुल, जिवंत काडतुसे व मोटारसायकल जप्त 


जळगाव प्रतिनिधी :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्ह्यात बेकायदेशीर शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करण्याच्या हालचालींवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, उमर्टी गावाकडून चोपडा मार्गे दोन संशयित इसम मोटारसायकलवरून बेकायदेशीर गावठी पिस्तुल बाळगून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उमर्टी गावाजवळ सापळा रचून (हिरोहोंडा, काळ्या रंगाची, MH-19-S-8460) या मोटारसायकलवरील दोन इसमांना ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

राहुल कुंवरसिंग पावरा (वय २२, रा. अर्टी, ता. चोपडा, जि. जळगाव)

गणपत प्रभाकर किरके (वय २८, रा. अंमळनेर जवळ बाजार, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली)

तपासादरम्यान आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला

१ गावठी बनावटीचे पिस्तुल

५ जिवंत काडतुसे

१ मोटारसायकल (MH-19-S-8460)

२ मोबाईल फोन

असा एकूण सुमारे ६९,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९/२०२६ अंतर्गत शस्त्र अधिनियम (Arms Act) कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलीस हवालदार विष्णू बिऱ्हाडे,दिपक माळी,रवींद्र पाटील,विलेश सोनवणे आणि पोलीस अंमलदार रावसाहेब पाटील सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव, यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

No comments