adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्र दिनानिमित्त चित्रकार सुनिल दाभाडे यांची अनोखी कलाकृती गहूच्या दाण्यावर साकारले आकर्षक मायक्रो पेंटिंग

 महाराष्ट्र दिनानिमित्त चित्रकार सुनिल दाभाडे यांची अनोखी कलाकृती गहूच्या दाण्यावर साकारले आकर्षक मायक्रो पेंटिंग  जळगाव प्रतिनिधी (संपादक -...

 महाराष्ट्र दिनानिमित्त चित्रकार सुनिल दाभाडे यांची अनोखी कलाकृती

गहूच्या दाण्यावर साकारले आकर्षक मायक्रो पेंटिंग 


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगांव: महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने चित्रकार सुनिल दाभाडे (कलाशिक्षक मानव सेवा विद्यालय ,जळगांव) यांनी आपल्या अप्रतिम कलाकौशल्याचा अनोखा आविष्कार सादर करत गहूच्या एका छोट्याशा दाण्यावर महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जपणारे सुंदर मायक्रो पेंटिंग साकारले आहे. या सूक्ष्म कलाकृतीमध्ये महाराष्ट्राचा नकाशा, छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा, ऐतिहासिक किल्ले आणि महाराष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक असलेली विविध सांस्कृतिक चिन्हे अत्यंत बारकाईने रेखाटण्यात आली आहेत. अवघ्या एका गव्हाच्या दाण्यावर इतकी सूक्ष्म आणि प्रभावी कलाकृती साकारल्याने पाहणारे आश्चर्यचकित होत आहेत.

चित्रकार सुनिल दाभाडे यांच्या या कल्पकतेतून महाराष्ट्राबद्दलचा अभिमान, कला आणि समर्पण यांचा सुंदर संगम दिसून येतो. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने साकारलेल्या या मायक्रो पेंटिंगची परिसरात मोठी चर्चा होत असून  संंस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस.डाकलिया, मानद सचिन विश्वनाथ जोशी व  सर्व पदधिकारी व सदस्य तसेच  प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर ,माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील ,शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच  कला रसिकांकडून त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे. “महाराष्ट्र माझा, अभिमान माझा” हा संदेश देणारी ही अनोखी कलाकृती केवळ कला नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला दिलेली मानवंदना आहे.

No comments