adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लोणवडी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सवात साजरी

 लोणवडी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सवात साजरी  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापुरः- भारतीय रा...

 लोणवडी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सवात साजरी 



अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापुरः- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची१३५ वी जयंती लोणवडी येथे आनंदात साजरी करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे १४ एप्रिल रोजी लोनवडी गावात भिमनामाच्या गजरात समाज बांधवांच्या वतीने अती उत्सवात जयंती साजरी करण्यात येत असते यावर्षी सुद्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध विहारात स्नेहभोज करून गावातून मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक मध्ये लहान मुले,महिला,पुरुष सर्व समाज बांधव समवेत बँडच्या वाजा गाज्यात डोक्यावर फेटा,गळ्यात निळा रुमाल,हातात निळा ध्वज, महिला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेऊन जयंतीचा आनंद साजरा करण्यात आला मुलींनी लेझीमचा आनंद घेतला तसेच निलेश रामदास वाघ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला असून यामध्ये गावातील नवयुवक मंडळ,समाजबांधव, समस्त गावकरी सहभागी होते.

No comments