adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चार महिन्यांपूर्वी लग्न, हुंड्यासाठी नवऱ्याने आणि सासूने नवविवाहित सोनाली ला संपविले, पतीला अन् सासूला मोहोळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

 चार महिन्यांपूर्वी लग्न, हुंड्यासाठी नवऱ्याने आणि सासूने नवविवाहित सोनाली ला संपविले, पतीला अन् सासूला मोहोळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या!   (स...

 चार महिन्यांपूर्वी लग्न, हुंड्यासाठी नवऱ्याने आणि सासूने नवविवाहित सोनाली ला संपविले, पतीला अन् सासूला मोहोळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या!  


(सोलापूर जिल्हा) रणजित मस्के प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सोलापुरांतील मोहोळ सारोळे येथे हुंड्यासाठी आणि मला तुम्ही वेळ देत नाही, अशा कौटुंबिक पती-पत्नीमध्ये झालेल्या वादांतून रागाच्या भरात पती प्रतीक शिंदे याने पत्नी सोनाली शिंदे हिचा गळा दाबून हत्या केली आहे. या मध्ये नवविवाहित सोनाली प्रतीक शिंदे (वय 22) असे  या मृत विवाहित महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मोहोळ पोलिसांनी पती प्रतीक आणि सोनालीच्या सासूला अटक केली आहे. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली. प्रथमदर्शनी पाहणी केली असता सोनाली ही बेडवर मृत अवस्थेत आढळून आली. मात्र पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्यानंतर सोनाली चा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून सोनाली चा अवघ्या चार महिन्यांपूर्वीच प्रतीक शिंदे याच्याबरोबर लग्न झाले होते. तुझ्या आई-वडिलांनी लग्नामध्ये मानपान हुंडा दिला नाही, म्हणून प्रतीक आणि सासू सोनालीचा छळ करत होते. तसेच सोनालीचा पती प्रतीक हा सोनालीला पाहत नव्हता व तिला तो आपला वेळ देत नव्हता, अशा झालेल्या वादांतून पती प्रतीक शिंदे याने पत्नी सोनालीचा गळा दाबून तिला जागेवरच संपविले, या घटनेनंतर सोनालीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मोहोळ पोलिसांनी पती प्रतीक शिंदे आणि सासूला अटक केली आहे. या घटनेमुळे पुण्यातील हुंडाबळी ठरलेली वैष्णवी हगवणे या घटनेला पुनरुक्ती मिळाली, मोहोळ तालुक्यांतून सारोळे गावामधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यांतून अशा दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.

No comments