adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बेलखेड येथे रक्तदान शिबिराद्वारे महात्मा फुले यांना अभिवादन ! युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 बेलखेड येथे रक्तदान शिबिराद्वारे महात्मा फुले यांना अभिवादन ! युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  अमोल बावस्कार बुलढाणा संपादक हेमकांत गायकवाड  ​...

 बेलखेड येथे रक्तदान शिबिराद्वारे महात्मा फुले यांना अभिवादन ! युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 


अमोल बावस्कार बुलढाणा

संपादक हेमकांत गायकवाड 

​तेल्हारा:-  क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून क्रांतिसूर्य युवा मंच, बेलखेड आणि श्री निष्काम समर्पण फाउंडेशन, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १० एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या या उपक्रमाला गावातील तरुणांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला. शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. सकाळपासूनच रक्तदानासाठी युवकांनी रांगा लावल्या होत्या. या शिबिरात संकलित झालेले रक्त गरजू रुग्णांना जीवदान देण्यासाठी अत्यंत मोलाचे ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. प्रत्येक रक्तदात्याला त्यांच्या या योगदानाबद्दल संस्थेच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी श्री निष्काम समर्पण फाउंडेशनचे पदाधिकारी आणि क्रांतिसूर्य युवा मंचचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. "केवळ जयंती साजरी न करता, रक्ताच्या रूपाने समाजातील गरजू घटकांना मदत करणे हीच महात्मा फुले यांना खरी आदरांजली आहे," अशा भावना आयोजकांनी व्यक्त केल्या. तसेच, भविष्यातही अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. ​बेलखेड ग्रामस्थांनी आणि परिसरातील नागरिकांनी या विधायक उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले असून, या शिबिरामुळे परिसरातून मोठ्या प्रमाणात रक्ताचे संकलन झाले आहे.

No comments