adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरच्या महात्मा गांधी बहुउद्देशीय सभागृहाची दुरवस्था पालिका प्रशासनाला निवेदन सादर

  फैजपूरच्या महात्मा गांधी बहुउद्देशीय सभागृहाची दुरवस्था पालिका प्रशासनाला निवेदन सादर  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक :- हेमकांत गायकवाड) फैज...

 फैजपूरच्या महात्मा गांधी बहुउद्देशीय सभागृहाची दुरवस्था पालिका प्रशासनाला निवेदन सादर 




इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

फैजपूर शहरातील सुभाष चौक परिसरात असलेल्या नगरपरिषदेच्या महात्मा गांधी बहुउद्देशीय सभागृहाची सध्या अतिशय दुरवस्था झाल्याचे या संदर्भात स्थानिक नागरिकांनी एकत्र येत नगरपरिषद प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर करून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सभागृहात दररोज साफसफाई केली जात नाही. तसेच खोल्यांचे दरवाजे, खिडक्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. टॉयलेट व बाथरूमचीही अत्यंत वाईट स्थिती असून तेथे स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे. याशिवाय, सभागृहात वीज व पाण्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संपूर्ण परिसरात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

नागरिकांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, सभागृहाची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास, शहरातील नागरिक लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांसाठी हे सभागृह भाडेतत्त्वावर घेतील. यामुळे नगरपरिषदेच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते.

तसेच, सभागृहाची नियमित देखभाल व सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी चौकीदार नेमण्याची मागणीही करण्यात आली आहे.

हे निवेदन उमेर शेख शहीद, जलील कुरैशी, काशिफ मेंबर, असलम मिस्त्री, अझहर शेख कैलाश भोई, राजा चंदनशिव, नितीन भोई, निलेश भोई, रियाज मेकॅनिक, दानिश मेंबर, दिगंबर सेठ आदीनी लेखी निवेदन सादर केले..

No comments