adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एकता चषक क्रिकेट स्पर्धेत ‘डॉ. इलेव्हन’चा दिमाखदार विजय

 एकता चषक क्रिकेट स्पर्धेत ‘डॉ. इलेव्हन’चा दिमाखदार विजय  भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : शहरातील बसस्टॅन्ड मैदानावर पीसीस...

 एकता चषक क्रिकेट स्पर्धेत ‘डॉ. इलेव्हन’चा दिमाखदार विजय 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : शहरातील बसस्टॅन्ड मैदानावर पीसीसी–पटेल क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित ‘एकता चषक’ ओपन नाईट क्रिकेट स्पर्धेत डॉ. अमित तडवी यांच्या नेतृत्वाखालील ‘डॉ. इलेव्हन’ संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यासह धुळे व बुऱ्हाणपूर परिसरातील अनेक नामांकित संघांनी सहभाग नोंदविला होता. गेल्या तीन दिवसांपासून नाईट स्वरूपात पार पडलेल्या या स्पर्धेत सामने नॉकआऊट पद्धतीने खेळवण्यात आल्याने प्रत्येक सामना चुरशीचा आणि रंगतदार ठरला. डॉ. अमित तडवी यांच्या नेतृत्वाखाली ‘डॉ. इलेव्हन’ संघाने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या फेरीत विवरा संघावर विजय मिळवत त्यांनी विजयी वाटचाल सुरू केली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात यावलच्या स्वराज्य संघाला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यात चोपडा संघावर मात करत त्यांनी अंतिम फेरी गाठली. 


अंतिम सामन्यात ‘डॉ. इलेव्हन’चा सामना रावेर येथील जावेद सर यांच्या ‘नॅशनल’ संघाशी झाला. अत्यंत रोमांचक ठरलेल्या या निर्णायक सामन्यातही डॉ. इलेव्हन संघाने उत्कृष्ट खेळ करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. विजयी संघात डॉ. अमित तडवी, मनोज पाटील, दीपक सोनवणे (बच्चा), विक्रांत गायगोले (मल्ली), सय्यद ताबिश, मुदस्सर (मुदा), अबू हुरैरा, वसीम अन्सारी, हेमंत बेहेरे, साजिद तडवी, पवन अडकमोल, तौकीर (धन्या), बंटी, गिरीश कोळी आणि जुम्मा या खेळाडूंचा समावेश होता. या विजयाबद्दल सर्व स्तरांतून संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, यावलचे सुप्रसिद्ध दंतचिकित्सक व अष्टपैलू क्रिकेटपटू डॉ. अमित तडवी यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी गोल्ड मेडलसह विविध पुरस्कार पटकावले असून ते नेहमीच यावलमधील तरुणांना क्रिकेटसाठी मार्गदर्शन करत असतात. स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक म्हणून ३१ हजार रुपये रोख रक्कम व ट्रॉफी सामाजिक कार्यकर्ते इजाज भाई देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी शहरातील नागरिक व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments