adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भुसावळ येथे मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना 'ॲक्शन मोड'मध्ये येण्याचे आदेश

  भुसावळ येथे मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना 'ॲक्शन मोड'मध्ये येण्याचे आदेश  भुसावळ प्रतिनिधी (...

 भुसावळ येथे मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना 'ॲक्शन मोड'मध्ये येण्याचे आदेश 


भुसावळ प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

भुसावळ: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रावेर लोकसभा मतदारसंघाची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक आज येथील 'हॉटेल प्रीमियर'मध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. नवनिर्वाचित संपर्क अध्यक्ष संदीपजी पाचंगे (मुंबई) व आशिषजी साबळे (पुणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत रावेर लोकसभा क्षेत्राचा सखोल आढावा घेण्यात आला. या बैठकीत रावेर लोकसभेअंतर्गत येणाऱ्या यावल रावेर,भुसावळ,जामनेर आणि मुक्ताईनगर या विधानसभा मतदारसंघांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली. प्रत्येक विधानसभेतील संघटनात्मक ताकद, स्थानिक जनसामान्यांच्या अडचणी आणि आगामी निवडणुकांचे नियोजन यावर यावेळी सविस्तर मंथन करण्यात आले.


बैठकीला संबोधित करताना संपर्क अध्यक्ष संदीप पाचंगे आणि आशिष साबळे यांनी संघटन बळकटीकरणासाठी खालील त्रिसूत्रीवर भर दिला: स्थानिक पातळीवर जनतेचे प्रश्न आक्रमकपणे सोडून पक्षाची भूमिका घराघरांत पोहोचवा. सभासद नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त नागरिकांना, विशेषतः तरुणांना पक्षाशी जोडा. विद्यार्थी सेनेवर भर "विद्यार्थी सेना हा पक्षाचा पाया आहे," असे नमूद करत कॉलेज तिथे युनिट' ही संकल्पना राबवण्याचे स्पष्ट आदेश यावेळी देण्यात आले. या बैठकीला मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक, संजय नन्नवरे, मनविसे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार, जामनेर तालुका अध्यक्ष अशोक पाटील, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष मधुकर भोई आणि भुसावळ तालुका अध्यक्ष दीपक सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच माजी सरपंच भिकाजी पाटील , आकाश पाटील, पंकज कोळी, योगेश कोळी, हेमंत चौधरी, रुपेश तेली, उदय पाटील यांच्यासह रावेर लोकसभा मतदारसंघातील शेकडो महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.. "आजची बैठक संघटनेला नवसंजीवनी देणारी ठरेल. कार्यकर्त्यांचा वाढता उत्साह पाहता, आगामी काळात रावेर लोकसभेत मनसेची ताकद अधिक सक्षमपणे दिसून येईल," असा विश्वास यावेळी जिल्हा नेतृत्वाने व्यक्त केला.

No comments