adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पाचोरा पोलिसांकडून दोन गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त पाचोरा पोलिसांची दबंग कारवाई

 पाचोरा पोलिसांकडून दोन गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त पाचोरा पोलिसांची दबंग कारवाई                                                           ...

 पाचोरा पोलिसांकडून दोन गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त पाचोरा पोलिसांची दबंग कारवाई      

 


                                                                      

 पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पाचोरा:- मा.पोलीस अधिक्षक सो श्री. महेश्वर रेड्डी,जळगाव, व मा.अपर पोलीस अधिक्षक सो,श्रीमती कविता नेरकर चाळीसगाव परिमंडळ यांनी दारुबंदी कायद्याखाली जास्तित जास्त प्रभावी कारवाई करणे बाबत सुचना प्राप्त झाल्या होत्या त्या नुसार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, श्री. बापु रोहम यांचे मार्गदर्शना खाली मा. पोलीस निरीक्षक सो, राहुलकुमार पवार यांना मिळालेल्या बातमी नुसार,पाचोरा पोलीस स्टेशन कडील नेमणुकीचे पोहवा/  दिलीप वाघमोडे, पोहवा/  अशोक हटकर, पोकाँ/  योगेश पाटील यांचे पथक तयार करुन मिळालेल्या बातमीनुसार, रवाना करण्यात आले होते 


त्या नुसार,वाघुलखेडा शिवारात हिवरानदीपात्रात ईसम नामे याकुब गनी हुसैन रिचवाले वय 42 वर्षे रा. सिंधी ता. भुसावळ ह.मु. वाघुलखेडा ता. पाचोरा जि. जळगांव हा गैरकायदा तिन दगडांची चुल माडून त्यावर पत्री ड्रम ठेवून त्या खाली भट्टी लावून एकुण 16000/- रु किंचे 150 लिटर गुळ, मोह, मिश्रित कच्चे पक्के रसायन व 10 लि. गाहभची तयार दारु गाळतानां व कब्जात बाळगतानां मिळुन आल्याने त्याचेविरुदध पाचोरा पोलीस स्टेशन गुरनं. 169/2026 महा. दारुबंदी अधि. कलम 65 फ, ब, क, ई नुसार दारुबंदी कायद्याखाली गुन्हा रजि. दाखल करण्यात आलेला आहे तसेच तारखेडा शिवारात धरणाचे खाली ईसम नामे भगवान रघुनाथ भिल रा. तारखेडा ता.पाचोरा जि. जळगांव हा गैरकायदा तिन दगडांची चुल माडून त्यावर पत्री ड्रम ठेवून त्या खाली भट्टी लावून एकुण 23000/- रु किंचे 200 लिटर गुळ, मोह, मिश्रित कच्चे पक्के रसायन व 30 लि. गाहभ ची तयार दारु गाळतानां व कब्जात बाळगतानां मिळुन आला. म्हणुन त्याचेविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशन गुरनं. 170/2026 महा. दारुबंदी अधि. कलम 65 फ, ब, क, ई नुसार दारुबंदी कायद्याखाली गुन्हा रजि. दाखल करण्यात आलेला आहे वर प्रमाणे दोन दारुबंदी कायद्याखाली मा.वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शना खाली प्रभावी कारवाया करुन दोन गुन्हे रजि दाखल करण्यात आले असुन दोन्ही गुन्हयाचे तपास पाचोरा पोलीस करित आहेत.

No comments