adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रविवार असून देखील शेतकर्यांचे हित जोपासणारे ग्राम महसूल अधिकारी भुषण पाटील....

 रविवार असून देखील शेतकर्यांचे हित जोपासणारे ग्राम महसूल अधिकारी भुषण पाटील....  विश्राम तेले चौगाव  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लासूर ता च...

 रविवार असून देखील शेतकर्यांचे हित जोपासणारे ग्राम महसूल अधिकारी भुषण पाटील.... 


विश्राम तेले चौगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

लासूर ता चोपडा सजेतील  महसूल विभागाच्या तलाठी कार्यालयात आधी लगीन कोंड्यानाचे मग रायबाचे या प्रमाणे आपले कर्तव्याला महत्त्व देणारे ग्राम महसूल अधिकारी भुषण पाटील हे त्यापैकी एक लासूर गावाला लाभलेले अधिकारी होय. 


वास्तविक आज रविवार म्हणजे हक्काची सुट्टी चा दिवस सोमवारी एक दिवसीय प्रक्षीशन देखील शेतकर्यांना उतारा मिळायला अडचण यायला नको. हा शुध्द हेतू डोळ्यासमोर ठेवून रविवार असून आपले ऑफिसात लोकांचे कामे करून देणारा आम्ही कधी पाहिला नाही. अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होतांना दिसत आहे. 

दरम्यान काही अधिकारी सोमवारी किंवा अन्य दिवसात ऑफिसात फिरकत नाही. शासकीय काम हे दाखवून सोमवारी हे भुषण पाटील हे येणार नाही. मग रविवारी का आपण ऑफिसात जावे. परंतु भुषण पाटील हे शेतकरी पुत्र असल्यामुळे शेतकर्यांना काय अडचण येत असते. याची परिपूर्ण जाण असल्याने कदाचित जळगाव जिल्ह्यातील महसूल विभागात भुषण पाटील हे एकमेव अधिकारी असायला पाहिजे की, रविवार असून देखील ऑफिसात बसून शेतकर्यांना विकास सोसायटी साठी लागणारे उतारे काढून देत आहेत.

No comments