adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रस्ते काँक्रिटीकरण कामांना मुदतवाढ नाही; मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आता ॲक्शन मोडवर !

 रस्ते काँक्रिटीकरण  कामांना मुदतवाढ नाही; मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आता ॲक्शन मोडवर !   रणजित मस्के मुंबई प्रतिनिधी.  (संपादक -:-...

 रस्ते काँक्रिटीकरण  कामांना मुदतवाढ नाही; मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आता ॲक्शन मोडवर ! 


 रणजित मस्के मुंबई प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नुकत्याच विराजमान झालेल्या अश्विनी भिडे यांच्या एन्ट्रीमुळे आता कर्मचाऱ्यांना देखील चांगलीच धास्ती भरली आहे. मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील कामांना आता चांगलाच वेग पाहायला मिळणार आहे. मुंबईत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा पहिला टप्पा 12 डिसेंबर 2026 नंतर दुसरा टप्पा 2027 पर्यंत पूर्णता: करावा या कामासाठी कोणतेही स्वरूपाची मुदतवाढ दिली जाणार नाही. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची कामे 31 मे पर्यंत होतील याची दक्षता घ्यावी असे आदेश मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत प्रशासनाला दिले असून. सध्याच्या कामाची 31 मे ची डेडलाईन जारी आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर (प्रकल्प) उपायुक्त ( पायाभूत सुविधा) गिरीश निकम उपायुक्त ( आयुक्त कार्यालय ) प्रशांत गायकवाड प्रमुख अभियंता ( रस्ते ) स्वामी यांच्यासह अभियंते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर मुंबई महापालिकेतील चार आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्तांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. तर स्वतःकडे विकास नियोजन विभाग आयुक्तांनी ठेवला आहे. यामध्ये अभिजीत बांगर अविनाश ढोकणे डॉ .बिपीन शर्मा आणि डॉ. अश्विनी जोशी यांचा समावेश आहे.

No comments