अंतुर्ली येथे डास निर्मूलनासाठी तातडीची कारवाई करा – अनिल वाडीले यांचे निवेदन किरण धायले अंतुर्ली ता. मुक्ताईनगर: (संपादक -:- हेमकांत गाय...
अंतुर्ली येथे डास निर्मूलनासाठी तातडीची कारवाई करा – अनिल वाडीले यांचे निवेदन
किरण धायले अंतुर्ली ता. मुक्ताईनगर:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली येथील वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन श्री. अनिल वाडीले यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.
सदर निवेदन माननीय प्रशासक तथा ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत अंतुर्ली यांना देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे परिसरात डासांचे प्रमाण लक्षणीय वाढले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने तातडीने फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी (फोमिंग) करावी, तसेच गटारी व साचलेल्या पाण्यावर जंतूनाशकांची फवारणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यामुळे संभाव्य आरोग्य समस्या टाळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

No comments