adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणी तिघांना अटक; १५७ सिलेंडर जप्त

  गॅस सिलेंडर चोरी प्रकरणी तिघांना अटक; 157 सिलेंडर जप्त    इदू पिंजारी | फैजपुर  (संपादक|हेमकांत गायकवाड) फैजपूर व वरणगाव परिसरात घडलेल्या ...

  गॅस सिलेंडर चोरी प्रकरणी तिघांना अटक; 157 सिलेंडर जप्त  


 इदू पिंजारी | फैजपुर 

(संपादक|हेमकांत गायकवाड)

फैजपूर व वरणगाव परिसरात घडलेल्या गॅस सिलेंडर चोरीच्या दोन गंभीर गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावत तिघा आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एकूण १५७ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत सुमारे ४ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दि. २५ एप्रिल २०२६ रोजी फैजपूर पोलीस ठाण्यात श्रीधर गॅस एजन्सीचे संचालक ललित रघुनाथ राणे (वय ५८) यांनी फिर्याद दिली होती. अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे कुलूप तोडून भारत गॅस कंपनीचे १४.२ किलो वजनाचे १०० भरलेले सिलेंडर (३,११,८०० रुपये) चोरून नेले होते. त्याआधी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी वरणगाव पोलीस ठाण्यात नरेंद्र उत्तमराव अहिर (वय ५१) यांनीही त्यांच्या गोडाऊनमधून ५७ सिलेंडर (७२,८४६ रुपये) चोरीला गेल्याची फिर्याद नोंदवली होती. या दोन्ही गुन्ह्यांची नोंद भारतीय न्याय संहिता अंतर्गत करण्यात आली होती.

या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तपासासाठी दोन स्वतंत्र पथके तयार करून घटनास्थळाचे निरीक्षण, सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला.

तपासादरम्यान शेख बिलाल शेख नबी (वय ३२, रा. कासोदा, ता. एरंडोल), वसीम खान शाबीर खान (वय ३१, रा. तांबापुरा, जळगाव) आणि चेतन सुरेश काळे (वय ३८, रा. नशिराबाद, ता. भुसावळ) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी इतर साथीदारांसह दोन्ही चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपींकडून ६२ भरलेले व ९५ रिकामे असे एकूण १५७ गॅस सिलेंडर तसेच गुन्ह्यात वापरलेली सुझुकी बर्गमन मोपेड (एमएच १९ ईयू ८८७१) जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

No comments