adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरमध्ये मुख्याध्यापक हाजी जाकीर सर यांचा भव्य सत्कार; सेवानिवृत्तीनिमित्त मान्यवरांची उपस्थिती

 फैजपूरमध्ये मुख्याध्यापक हाजी जाकीर सर यांचा भव्य सत्कार; सेवानिवृत्तीनिमित्त मान्यवरांची उपस्थिती  इदू पिंजारी, फैजपूर (संपादक -:- हेमकांत...

 फैजपूरमध्ये मुख्याध्यापक हाजी जाकीर सर यांचा भव्य सत्कार; सेवानिवृत्तीनिमित्त मान्यवरांची उपस्थिती 


इदू पिंजारी, फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूलचे मुख्याध्यापक हाजी शे. जाकीर शे. करीम यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शहरात भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. त्यांच्या दीर्घ शैक्षणिक सेवेला गौरविताना शाळा तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला. हाजी जाकीर सर हे विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका तसेच फैजपूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपुलकीने मिसळणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या साध्या, विनम्र स्वभावामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. सेवानिवृत्तीनिमित्त शाळेत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यानंतर त्यांच्या तहानगर येथील निवासस्थानीही शेकडो मान्यवरांनी भेट देत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


या प्रसंगी धनंजय चौधरी, करीम सालार, जळगाव येथील फारुख शेख, जमाते इस्लामी संघटनेचे शहराध्यक्ष अब्दुल रऊफ जनाब, माजी उपनगराध्यक्ष कलीम खा मन्यार, नगरसेवक अनवर खाटीक, नगरसेवक आवेश भांजा, माजी उपनगराध्यक्ष शे. कुर्बान शे. करीम, सावदा येथील अजगर सय्यद, माजी नगराध्यक्ष पी. के. चौधरी, डॉ. जलील शेख, अब्दुल्ला रसूल, मौलाना आझाद हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आर. क्यू. सर, वैद्य सर, वसीम जनाब, नासिर हुसेन शे. करीम, पत्रकार इदू पिंजारी, राजू तडवी, सलीम पिंजारी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मौलाना आझाद हायस्कूल व म्युनिसिपल हायस्कूलचे सर्व शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून जाकीर सरांना भावपूर्ण निरोप दिला. हाजी जाकीर सर यांच्या सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे मार्गदर्शन समाजाला लाभत राहील, अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

No comments