अमरावती महापालिकेच्या नव्या आयुक्त वर्षा लड्डा यांनी पदभार स्वीकारला; तर आयुक्त सौम्या चांडक नेहमीच प्रयत्नशील राहिल्या! (अमरावती जिल्हा)...
अमरावती महापालिकेच्या नव्या आयुक्त वर्षा लड्डा यांनी पदभार स्वीकारला; तर आयुक्त सौम्या चांडक नेहमीच प्रयत्नशील राहिल्या!
(अमरावती जिल्हा) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राज्य शासनाने गुरुवारी भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून. यामध्ये अमरावती प्रशासनात देखील मोठा बदल दिसून आला आहे. यामध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदेला दोन वरिष्ठ अधिकारी मिळाले आहेत. वर्षा लड्डा यांनी अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त तर सत्यम गांधी यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. अमरावतीच्या आयुक्त सौम्या शर्मा-चांडक या आपल्या कौटुंबिक कारणामुळे रजेवर गेल्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर वर्षा लड्डा अमरावती महापालिकेच्या आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे. यावेळी नूतन आयुक्तांनी शहरांच्या विकासाला गती दिशा देण्याच्या आणि सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी पुष्पगुच्छ देवुन त्यांना शुभेच्छा दिल्या. वर्षा लड्डा यापूर्वी पुणे येथील महाराष्ट्र कृषी संशोधन व शैक्षणिक परिषदेत सदस्य सचिव म्हणून कार्यरत होत्या.

No comments