adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नांद्रा येथे अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाचा धडक छापा, ट्रॅक्टर महसूल विभागात जमा

 नांद्रा येथे अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाचा धडक छापा, ट्रॅक्टर महसूल विभागात जमा   पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद (संपादक -:- हेमकांत गायकव...

 नांद्रा येथे अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाचा धडक छापा, ट्रॅक्टर महसूल विभागात जमा  


पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पाचोरा तालुक्यातील नांद्रा परिसरात अवैध वाळू उपसा आणि वाहतु कीविरोधा 'त महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नांद्रा मंडळाच्या अधिकारी सौ. वैशाली पाटील आणि तलाठी कु. जिज्ञासा पाटील यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून जप्त केले मिळालेल्या माहितीनुसार, नांद्रा परिसरातून अवैध वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली होती. त्यानुसार आज पहाटेपासूनच महसूल विभागाने सापळा रचला होता. सकाळी ७:३० वाजता वाळूने भरलेले ट्रॅक्टर जात असताना वैशाली पाटील व जिज्ञासा पाटील यांनी ते थांबवून कागदपत्रांची विचारणा केली. मात्र, कोणतीही वैध रॉयल्टी किंवा परवानगी नसल्याचे समोर आल्याने हे ट्रॅक्टर तात्काळ ताब्यात घेण्यात आले.जप्त केलेले हे ट्रॅक्टर पाचोरा तहसील कार्यालयात जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. महिला अधिकाऱ्यांनी पहाटेच केलेल्या या धाडसी कारवाईचे तालुक्यात कौतुक होत आहे.पुढील दंडात्मक कारवाई तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.

No comments