adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त भव्य महोत्सवाचे आयोजन..

 विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त भव्य महोत्सवाचे आयोजन.. जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक सुरेश बनसो...

 विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त भव्य महोत्सवाचे आयोजन..

जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक सुरेश बनसोडे तसेच मार्गदर्शकपदी अशोकराव गायकवाड,कार्याध्यक्षपदी सुमेध गायकवाड,निमंत्रकपदी मा. नगरसेवक अजयराव साळवे, सचिवपदी किरण दाभाडे यांची निवड  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त शहरात भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून,जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे. या महोत्सवाची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार असून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेत आयोजकांनी सांगितले की, यंदा जयंती मोठ्या उत्साहात आणि एकजुटीने साजरी केली जाणार आहे. शहरातील तसेच उपनगरातील सर्व मंडळांचा या महोत्सवात सहभाग असणार असून, पूर्णाकृती पुतळ्यासमोरील मैदानावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

महोत्सवानिमित्त चित्रकला, रांगोळी, निबंध, वक्तृत्व स्पर्धा तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 14 एप्रिल रोजी भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून ती शांततेच्या मार्गाने पार पाडण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

9 एप्रिल रोजी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा गायनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंतीही समितीच्या वतीने साजरी करण्यात येणार आहे.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुरेश बनसोडे यांनी सर्वांचे आभार मानून शहरातील आंबेडकरी समाजासह सर्व नागरिकांनी या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले. नगरसेवक मयूर बांगरे यांनी 14 एप्रिल हा दिवस केवळ सुट्टी म्हणून न साजरा करता एकत्र येऊन जयंती उत्साहात साजरी करण्याचे आवाहन केले. जयंती महोत्सव सुमारे पंधरा दिवस चालणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी सर्वानुमते डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे यांचा सत्कार करताना ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, सुमेध गायकवाड ,नगरसेवक मयूर बांगरे, सुनील शिंदे,

, जयंत गायकवाड, प्रा. विलास साठे, किरण दाभाडे, अंकुश मोहिते, समीर भिंगारदिवे, सिद्धार्थ आढाव, येसुदास वाघमारे आदींसह समितीचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समितीची सविस्तर रचना पुढीलप्रमाणे- मार्गदर्शक – अशोक गायकवाड, अध्यक्ष – सुरेश भाऊ बनसोडे, कार्याध्यक्ष – सुमेध गायकवाड, निमंत्रक - अजय राव साळवे, सचिव – किरण दाभाडे,

उपाध्यक्ष -, विशाल गायकवाड, कौशल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, अमित काळे, सुजित घंगाळे, विनोद भिंगारदिवे, मुन्ना भिंगारदिवे, जय कदम, विजय गायकवाड, दीपक लोंढे, सुनील कांबळे, अक्षय भिंगारदिवे, विजय भिंगारदिवे, विशाल कांबळे, सागर ठोकळ

क्रीडा व सांस्कृतिक विभाग प्रमुख - प्रा जयंत गायकवाड , प्रा विलास साठे , प्रा जाधव एल बी , प्रा डी आर जाधव, प्रा. पगारे सर, प्रसिध्दी प्रमुख - महेश भोसले , सचिन मोकळं , संदीप शिंदे

सल्लागार – जेवियर भिंगारदिवे, लॉरेन्स स्वामी, , नगरसेवक मयूर बांगरे, संभाजी भिंगारदिवे, सुनील शेत्रे, सुनील साळवे, परिमल निकम ,संजय जगताप, प्रवीण चाबुकस्वार, विजय गव्हाळे, महेंद्र राजगुरू, अँड संदीप पाखरे, दीपक अमृत, विजय भांबळ, सुनील शिंदे, सदाशिव भिंगारदिवे, जयाताई गायकवाड, गौतमी भिंगारदिवे, भाऊ भिंगारदिवे, किरण गायकवाड, दीपक पाटोळे , दीपक अमृत, मिरवणूक नियोजन समिती- शुभम भिंगारदिवे, राजू दाभाडे, विशाल साळवे, आकाश सरोदे, अजय शेळके, जय कदम, सुजित घंगाळे, विशाल गायकवाड, सिद्धांत वाकचौरे, समीर भिंगारदिवे, संजय साळवे आदी मान्यवरांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

एकूणच, शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि उत्साहाचा संदेश देणारा भव्य महोत्सव साजरा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments