कारागृहात एटीएम फोडणाऱ्या आरोपीचा गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- ...
कारागृहात एटीएम फोडणाऱ्या आरोपीचा गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर/पारनेर :-स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका आरोपीने पारनेर कारागृहात धारदार वस्तूने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र,कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आरोपीचा जीव थोडक्यात वाचला असून,त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संदीप भजन सिंग (वय २२, मूळ रा. पंजाब, सध्या रा. निघोज, ता. पारनेर) हा आरोपी पारनेर कारागृहात बंदिस्त होता.१३ एप्रिल रोजी सकाळी १०:५० च्या सुमारास त्याने कुठल्या तरी धारदार वस्तूने स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतले.हे दृश्य बाहेर बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस कॉन्स्टेबल सागर धुमाळ यांच्या निदर्शनास आले.त्यांनी तातडीने इतर सहकाऱ्यांना बोलावून आरोपीला ताब्यात घेतले आणि उपचारासाठी रुग्णालयात हलवले.वेळेवर उपचार मिळाल्याने आरोपीचा जीव वाचला आहे.आरोपी संदीप सिंग याने २२ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास निघोज येथील स्टेट बँकेचे एटीएम लोखंडी हत्याराने फोडून रोकड लंपास करण्याचा प्रयत्न केला होता.याप्रकरणी संकेत चंद्रशेखर वैद्य (रा. नाशिक) यांनी फिर्याद दिली होती.पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला शिरूर येथून अटक केली होती.आरोपीला जेरबंद करण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष खेडकर,सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कडू,पोलीस अंमलदार अमोल धामणे,कल्याण लगड,गणेश डोंगरे,सारंग वाघ,विजय जाधव, सागर साबळे,प्रकाश बोबडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.आत्महत्येच्या प्रयत्नानंतर आता पोलीस कॉन्स्टेबल सागर धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदीप सिंग विरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा अतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments