adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आपल्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करा_प्रा ए के गंभीर

 आपल्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करा_प्रा ए के गंभीर   विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  लासूर ता चोपडा येथे क्रांतिसूर्य महा...

 आपल्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करा_प्रा ए के गंभीर  


विश्राम तेले चौगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 लासूर ता चोपडा येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व  यांच्या जयंती निमित्त  महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या जिवन कार्यावर आधारित (सामान्य ज्ञान परीक्षा) चे आयोजन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आले होते सदर परीक्षेचा बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन महापुरुषांच्या जयंती निमित्त करण्यात आले सामान्यज्ञान परीक्षेसाठी लासूर येथील ९१ विद्यार्थीनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेसाठी लासूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चे माजी व्हा. चेअरमन प्रकाश राघो माळी सर यांचे कडून प्रथम पारितोषिक रु.१५०१, व्दितीय पारितोषिक महाकाल गृप चे अध्यक्ष पवन शांताराम महाजन यांचे कडून रु.११०१, व तृतीय पारितोषिक मातोश्री अग्रो चे संचालक योगेश सुधाकर महाजन यांचे कडून रु.७०१, व उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून भेट वस्तू नाटेश्वर पीक संरक्षण सोसायटी चे माजी संचालक मुकेश विठ्ठल माळी यांचे कडून देण्यात  आले.त्यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रा ए के गंभीर यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करावी.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. तसेच युवक संघाचे संस्थापक महाराष्ट्र भूषण, लोकनेते स्व.सचिन गुलदगड यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश चे अध्यक्ष ए.के.गंभीर सर हे होते तसेच उतुंग यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण चोपडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अंजली बर्गे मॅडम यांच्या शुभहस्ते देण्यात आले. सदर स्पर्धेत प्रथम चारू समाधान लोहार , द्वितीय पियुष तुषार महाजन व तृतीय रोशनी संजय महाजन व समृद्धी विनोद महाजन यांनी क्रमांक पटकाविले .सदर कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून  लासूर ग्रामपंचायतीचे माजी लोकनियुक्त सरपंच जनाताई माळी, माळी समाजाचे माजी अध्यक्ष शंकर माळी,श्रीराम मंदिर बांधकाम समिती चे अध्यक्ष हिम्मतराव महाजन, संत सावता महाराज पतसंस्थेचे चेअरमन हिम्मतराव माळी सर, व्हा.चेअरमन जयमाला अमरदास महाजन, समाज विकास मंडळाचे उपाध्यक्ष रामकृष्ण माळी, सचिव सुरेश पवार, किसान विद्या प्रसारक मंडळाचे सचिव विक्रम रामदास माळी, वि.का.सो. चेअरमन योगेश पाटील, व्हा.चेअरमन युवराज बाविस्कर सर, माजी व्हा. चेअरमन प्रकाश राघो माळी सर, भाजपा ग्रामीण तालुका उपाध्यक्ष भिकन माळी, पदवीधर प्रकोष्ठ भाजपा जळगाव जिल्हा संयोजक भरत सोनगिरे सर, माऊली महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ.भावनाताई  महाजन,उपाध्यक्ष देवकाबाई रतन महाजन, सचिव चंद्रकला कैलास माळी, माळी, सह सचिव जयश्री नरेंद्र महाजन, शालेय व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा जागृती उमेश महाजन,महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक एच वाय वारडे सर,पत्रकार अजय पालीवाल, पत्रकार दिलीप पालीवाल, मातोश्री अग्रो चे संचालक योगेश सुधाकर महाजन, नाटेश्वर पीक संरक्षण सोसायटी चे माजी संचालक मुकेश विठ्ठल माळी,A-वन क्लासेस चे संचालक राहुल पाटील सर, सरस्वती क्लासेस चे संचालक विनोद महाजन सर तसेच विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

तसेच सदर बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी विशेष उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्ती त्यात श्री.राजू बाविस्कर यांचे काळ्या निळ्या रेषा आत्मकथनाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल, डॉ. दिपाली कुंदन साळुंखे यांना बिझनेस स्टाईल आयकॉन अवॉर्ड मिळाल्याबद्दल, कु. गायत्री पितांबर कोळी हे जळगाव पोलीस या पदावर निवड झाल्याबद्दल, श्री.नरेंद्र नामदेव महाजन यांना जिल्हा क्रीडा विभागामार्फत जिल्हा आदर्श क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीआई यांचे फ्रेम देऊन सन्मानित करण्यात आले.

    सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविकात श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी संघटनेच्या माध्यमातून घेतलेला महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन कार्यावर आधारित (सामान्य ज्ञान परीक्षा) च्या माध्यमातून त्यांनी समाजाप्रती दिलेले योगदान , केलेला त्याग त्यांनी जीवनकार्य याबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी तसेच विद्यार्थी प्रेरणा देण्यासाठी अश्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते  तसेच वर्षभरात राबविण्यात येणारे विविध उपक्रमा बाबत माहिती दिली.

पंचायत समिती चोपडा येथील गट विकास अधिकारी अंजली बर्गे मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी अश्या विविध स्पर्धामध्ये सहभाग घेऊन विद्यार्थीनी प्रशासकीय अधिकारी होणेसाठी स्पर्धा परिक्षेकडे वळावे असे आव्हान केले तसेच थोर महापुरुष यांच्या कार्याला उजाळा दिला त्याचप्रमाणे यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच सदर कार्यक्रमप्रसंगी एच वाय वारडे सर, प्रताप विद्या मंदिर चे उपशिक्षक नरेंद्र नामदेव महाजन सर,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या दिलेले योगदाना बाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.

   अध्यक्षयी भाषणात क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश चे अध्यक्ष ए.के.गंभीर यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पालकांसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा तसेच आपल्या आई व वडिलांची सेवा करावी व कितीही मोठ्या पदावर गेले तरीही कुटुंबाचे व समाजाचे ऋण न विसरता कार्य करावे असे मत मांडले.

        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवक संघाचे विभागीय संपर्क प्रमुख समाधान माळी सर, जिल्हाध्यक्ष महेंद्र माळी, जिल्हा उपाध्यक्ष अल्केश महाजन, A-वन क्लासेसचे संचालक राहुल पाटील सर, उप संचालक यश महाजन सर युवक संघाचे पदाधिकारी रोहित माळी, विठ्ठल माळी, मयूर माळी, प्रेमराज शेलकर सर, अमोल गंभीर, साहेबराव मगरे, भूमेश्वर मगरे, विनोद मगरे, योगेश माळी, आदी संघटनेचे पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विनोद महाजन यांनी व आभार प्रदर्शन समाधान माळी  यांनी केले.

No comments