चोपडा तालुक्यातील धक्कादायक हल्ला प्रकरण — सर्व आरोपी अटकेत,१० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा...
चोपडा तालुक्यातील धक्कादायक हल्ला प्रकरण — सर्व आरोपी अटकेत,१० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील धानोरा परिसरात घडलेल्या गंभीर हल्ला प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली असून,न्यायालयाने आरोपींना १० एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास,धानोरा येथील शिवाबंदा हॉटेल परिसरात किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यातून गंभीर स्वरूपाचा हल्ला करण्यात आला.या प्रकरणी अडावद पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ७२/२०२६ नोंदवण्यात आला असून, भारतीय दंड संहितेच्या कलम १०९,११५(२), ३५२,३५१(२),१८९(२),१९१(२),१९१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींची नावे
या प्रकरणात खालील आरोपींना अटक करण्यात आली असून असे
गणेश हिम्मत कोळी,जितेंद्र नाईक,गोपीचंद कोळी,भूषण लोढे कोळी,गौरव कोळी,तसेच इतर सहआरोपींचाही समावेश आहे.या हल्ल्यात गणेश गुलाब सोनवणे (वय २२ वर्षे) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.प्राथमिक तपासानुसार, जुन्या वादातून राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीवर चॉपरसारख्या धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत फिर्यादीवर गंभीर वार करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
सदरील प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद तात्यासाहेब वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अधिक माहिती गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे.तसेच गुन्ह्यातील सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने १० एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुढील तपासासाठी पोलिसांना अधिक वेळ मिळणार आहे.या घटनेमुळे चोपडा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments