adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आदिवासी कोळी बहुउद्देशीय शिखर संस्था, रावेर यांच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन

 आदिवासी कोळी बहुउद्देशीय शिखर संस्था, रावेर यांच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन  रावेर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर:- वाघोदा ...

 आदिवासी कोळी बहुउद्देशीय शिखर संस्था, रावेर यांच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन 


रावेर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर:- वाघोदा खुर्द येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी आदिवासी कोळी बहुउद्देशीय शिखर संस्था, रावेर यांच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत रावेर तालुक्यातील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करत संस्थेचा प्रसार-प्रचार वाढविणे तसेच सदस्यसंख्या वृद्धीसाठी पुढील नियोजन आखण्यात आले. बैठकीत निवडणूक आयोगाशी संबंधित सुरू असलेल्या SRI याद्यांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच आगामी जनगणनेत समाजाची नोंद “टोकरे कोळी” या नावाने व्हावी, यासाठी संपूर्ण रावेर तालुक्यात व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी संस्थेचे सल्लागार अशोक कोळी यांच्या चिरंजीवांची पुणे येथे आयटी क्षेत्रात उच्च पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

बैठकीस संस्थेचे अध्यक्ष मनोहर कोळी (सुलवाडी), उपाध्यक्ष विनोद कोळी (पुनखेडा), सचिव योगेश्वर कोळी यांच्यासह संचालक मंडळ व ज्येष्ठ सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये संतोष सपकाळे (आप्पा सिंगत), हरिलाल भाऊ कोळी (कांडवेल), सुभाष सपकाळे (सुनोदा), विनोद कोळी (नेहता), गोपाळ कोळी (खिरवड), विक्की कोळी (चोरवड), भुषण तायडे (रावेर), ईश्वर कोळी (चिनावल), अशोक कोळी (वाघोदा खुर्द), सुपडू कोळी (थोरगव्हाण), शरद कोळी (आंदलवाडी), विजय कोळी (अजनाड) आदी मान्यवरांचा समावेश होता.

तसेच स्थानिक पातळीवर चुडामण सपकाळे, चिराग कोळी, बाळू कोळी, दीपक कोळी, तुषार कोळी, दीपक तायडे, रवींद्र कोळी, राजेंद्र कोळी, शंकर कोळी, धोंडू कोळी, कैलास सपकाळे (सुनोदा), तुळशीराम सपकाळे (मस्कावद) यांच्यासह आदिवासी टोकरे कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी एकजूट राखण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

No comments